Home /News /viral /

VIDEO : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत रात्रभर विहिरीच्या पाण्यात गारठलं हरिण; सकाळी ग्रामस्थांनी पाहिलं आणि...

VIDEO : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत रात्रभर विहिरीच्या पाण्यात गारठलं हरिण; सकाळी ग्रामस्थांनी पाहिलं आणि...

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ग्रामस्थांना विहिरीत आवाज ऐकू आला. ग्रामस्थांनी विहिरीत पाहिल्यावर हरिण पाण्यात तरंगताना, पोहताना दिसलं.

    ललितपूर, 22 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील ललितपूरमध्ये मंगळवारी एका मोठ्या विहिरीत हरिण पडलं. ग्रामस्थांना हरिण विहिरीत पडल्याची माहिती मिळताच, सर्वांनी रश्शीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक प्रयत्नांनंतर अखेर त्या हरणाला सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात यश आलं. मध्यरात्री अंधारात जंगलातून आलेलं हरिण अचानक विहिरीत पडलं. सकाळी लोकांनी हरणाचा आवाज ऐकला. त्याला वाचवण्यासाठी काही ग्रामस्थ विहिरीत उतरले. यावेळी हरणाला रेस्क्यू करताना व्हिडीओ काढण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला असून व्हिडीओत हरणाला बाहेर काढण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करण्यात आले, ते स्पष्टपणे दिसतंय. हरणाला सुखरूप रेस्क्यू केल्यानंतर ग्रामस्थांनी, वन विभागाला याबाबत सूचना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ग्रामस्थांना विहिरीत आवाज ऐकू आला. ग्रामस्थांनी विहिरीत पाहिल्यावर हरिण पाण्यात तरंगताना, पोहताना दिसलं. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीत उतरून रश्शीच्या साहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचवला. विहिरीत पडलेल्या हरणाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. हरिण रात्रीच्या अंधारात जंगलातून निघून शेतात आला आणि विहिरीत पडल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे. हरणाला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याला काही वेळ उन्हात बसवण्यात आलं. त्यानंतर वन विभागाला याची सूचना देण्यात आली आणि वन विभाग कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून हरणाला जंगलात घेऊन जाण्याच्या कामाला सुरूवात केली. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या हरणाची मोठी चर्चा रंगली होती.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Viral videos

    पुढील बातम्या