• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • रात्री भिंतीसोबत बोलयाचा महिलेचा पती; डॉक्टरांकडे घेऊन जाताच झाला धक्कादायक खुलासा

रात्री भिंतीसोबत बोलयाचा महिलेचा पती; डॉक्टरांकडे घेऊन जाताच झाला धक्कादायक खुलासा

एक दिवस रात्रीच या व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीला बडबडताना पाहिलं. सोबतच हा व्यक्ती थरथर कापत होता. हे पाहून ती आपल्या पतीला थेट डॉक्टरकडे घेऊन गेली

 • Share this:
  नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : भूतं खरंच असतात का या गोष्टीवरुन गेल्या अनेक काळापासून मतभेद आहेत. काही लोक याला केवळ अफवा समजतात तर काही लोक यावर विश्वास ठेवतात. तुम्ही अनेकदा अशाही घटना पाहिल्या असतील ज्यात लोक आपल्या अंगात भूत आल्याचं सांगतात (Paranormal Activity). यासाठी लोक तांत्रिकाकडेही जातात. अनेकदा तर काही आजारांनाही लोक यासोबत जोडतात. यानंतर रुग्णाला तांत्रिकाकडे घेऊन जाण्यात येतं. यात अनेकदा लोकांचा मृत्यूही होतो. अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीलाही भूताच्या भितीनं तांत्रिकाकडे नेण्यात आलं. मात्र सुदैवाने त्याची पत्नी शिकलेली आणि सुशिक्षित होती. तिनं आपल्या पतीची अवस्था पाहून त्याला रुग्णालयात नेलं. इथे डॉक्टरांनी त्याच्या डोक्यातून अशी गोष्ट बाहेर काढली जी पाहून सगळेच हैराण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती एकटात बडबडत असे. यामुळे त्याच्या अंगात भूत आल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र या व्यक्तीच्या पत्नीनं यावर विश्वास ठेवला नाही. एक दिवस रात्रीच या व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीला बडबडताना पाहिलं. सोबतच हा व्यक्ती थरथर कापत होता. हे पाहून ती आपल्या पतीला थेट डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करून घेतलं. या व्यक्तीच्या मेंदूची तपासणी केली गेली. यात समोर आलं की या सर्वामागे भूत-प्रेत नाही तर डोक्यात मरलेला एक किडा आहे (Dead Worm Found in Brain). या व्यक्तीच्या डोक्यातून एक मृत टेपवर्म बाहेर निघाला. रुग्णालयानं लगेचच हा किडा त्याच्या डोक्यातून बाहेर काढला. सर्जरीनंतर आता या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी या महिलेचं कौतुक करत म्हटलं की जर या व्यक्तीला वेळीच रुग्णालयात भर्ती केलं नसतं तर त्याची अवस्था आणखीच वाईट झाली असती. महिलेनं त्याला रुग्णालयात दाखल केल्यानं सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: