कॅनबेरा, 04 जुलै : सामान्यपणे मुलगी सर्वात जास्त प्रेम करते ती आपल्या वडिलांवर. वडिलांसाठीही मुलगी म्हणजे जीव की प्राण असते (Daughter father news). त्यामुळेच आयुष्यात कितीही संकटं आली तरी डोळ्यात अश्रूही न आणणारा बाप लेकीच्या लग्नात मात्र इतका हळवा होतो की ढसाढसा रडतो. बाबाही या जगातून निघून जातो तेव्हा लेक ते दुःख पचवूच शकत नाही. पण सध्या अशा बापलेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे (Daughter give Alcoholic drink to dying father).
वडील रुग्णालयात शेवटच्या घटका मोजत असताना लेकीने त्यांच्यासोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. तिचं कृत्य पाहून सुरुवातीला सर्वांनी संताप व्यक्त केला. पण नंतर मात्र बहुतेकांनी तिचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पेनेलोप अन्नचा तिच्या वडिलांसोबतचा शेवटचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
व्हिडीओत पेनेलोपचे वडील रुग्णालयाच्या बेडवर झोपलेले दिसत आहेत. त्यांना गंभीर आजार आहे आणि मृत्यू जवळ आला आहे. असं असताना त्यांची पेनेलोप मात्र रुग्णालयात दारूची बाटली, कोल्ड ड्रिंक घेऊन जाते. दारूच्या बाटलीतून दारू ती एका सीरिंजमध्ये भरते आणि ती सीरिंज आपल्या वडिलांच्या तोंडात टाकते. वडिलांना सीरिंजने ती दारू पाजत असते. पेनेलोपने हे सर्व डॉक्टर आणि नर्सपासून लपूनधपून केलं आहे.
हे वाचा - Shocking! बहीण-भावाने एकमेकांशी केलं लग्न; जन्माला आलं विचित्र मूल, काही तासांतच मृत्यू
व्हिडीओत ती आपली सर्व तयारी झाली आहे, फक्त वडिलांना चव चाखायला देते असं म्हणताना दिसते. सीरिंजमध्ये रम भरून ती आपल्या वडिलांनाही आपण रम आणलं आहे आणि सीरिंजमध्ये भरून ते तुमच्या तोंडात टाकू असं सांगते. जेव्हा तिने आपल्या वडिलांना रम दिली तेव्हा तिच्या वडिलांनीही त्याची चव चांगली असल्याचं सांगितलं.
वडील मरणाच्या दारात असताना लेकीनं असं काही करणं हे संतापजनकच आहे. कुणालाही राग आवरणार नाही. पण यामागील कारण समजलं तर तुमचाही राग शांत होईल.
व्हिडीओ पोस्ट करताना पेनेलोपने सांगितलं, वडिलांना दुसऱ्या जगात पाठवण्याआधी त्यांच्यासोबत शेवटची ड्रिंक शेअर करते आहेत. तोपर्यंत जोपर्यंत आम्ही पुन्हा भेटत नाही. अलविदा ओल्ड मॅन. लव्ह यू.
हे वाचा - 12 व्यांदा लग्न करण्याच्या तयारीत होती महिला; मात्र बसला झटका!
यावरून दारू पिणं ही पेनेलोपच्या वडिलांची शेवटची इच्छा होती. आपल्या प्रिय व्यक्तीची शेवटची इच्छा पूर्ण करणं हे अनेकांसाठी महत्त्वाचं असतं. त्यासाठी ते लोक ती इच्छा कशीही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतता. पेनेलोपनेही तेच केलं.
त्यामुळे व्हिडीओ पाहून सुरुवातीला सर्वांना आश्चर्य वाटलं पण जेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरण समजलं, नेमकं कारण समजलं तेव्हा त्यांनीच तिचं कौतुकही केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.