मराठी बातम्या /बातम्या /Viral /पुरामुळे मायलेकीची ताटातूट! आईला भेटण्यासाठी कासावीस झालेल्या मुलीने ओलांडला 'मृत्यूचा पूल'

पुरामुळे मायलेकीची ताटातूट! आईला भेटण्यासाठी कासावीस झालेल्या मुलीने ओलांडला 'मृत्यूचा पूल'

पुरामुळे आपण आईला गमावलं अशी भीती तिला वाटत असतानाच अचानक आई तिला दिसली आणि त्यानंतर तिला भेटण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.

पुरामुळे आपण आईला गमावलं अशी भीती तिला वाटत असतानाच अचानक आई तिला दिसली आणि त्यानंतर तिला भेटण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.

पुरामुळे आपण आईला गमावलं अशी भीती तिला वाटत असतानाच अचानक आई तिला दिसली आणि त्यानंतर तिला भेटण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही.

क्वालालांपूर, 02 मार्च : मलेशियात (Malaysia) पुराने (Malaysian Flood) हाहाकार माजवला आहे. सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. पुरामुळे ताटातूट झालेल्या मायलेकीचा हा फोटो व्हायरल होतो आहेत. ज्यात आईला भेटण्यासाठी लेकीची धडपड दिसते आहे. आईपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. 'मृत्यूचा पूल'च तिने ओलांडला आहे (Daughter mother reunite in Malaysia flood).

पुरामुळे आई आणि लेक एकमेकांपासून वेगळे झाले होते. दोन दिवसांनंतर त्या दोघी एकमेकांसमोर आल्या. आईला पाहताच मुलगी तिला भेटण्यासाठी कासावीस झाली. त्यानंतर तिने खतरनाक पाऊल उचललं.

कॉस्मोच्या रिपोर्टनुसार दोन दिवसांसाठी या मायलेकी वेगळ्या झाल्या होत्या. आपण आपल्या आईला आता कायमचं गमावलं असं तिला वाटत होतं. अचानक एक दिवस तिला तिची आई दिसली. पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्यासमोर मृत्यूच होता.

हे वाचा - एका लग्नाची अजब कहाणी; घोडा-कारऐवजी स्ट्रेचरवर लग्नमंडपात पोहोचला नवरदेव कारण...

पूर आलेल्या नदीच्या खवळलेल्या पाण्यावर एक तुटलेला ब्रीज होता. पुलाजवळच एक विजेची तारही होती. त्यामुळे हा ब्रीज म्हणजे मृत्यूचाच पूल होता कारण त्यावरून जाणं म्हणजे जीव धोक्यात घालणं. थोडी जरी चूक झाली असती, पूल तुटला असता किंवा विजेच्या तारेचा झटका लागला असता तर तिचा मृत्यू झाला असता.

पण तरी मुलीला समोर दिसत होती ती फक्त आई. तिच्यासमोर तिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. हा पूल ओलांडत ती नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर आपल्या आईकडे गेली आणि दोघींनीही एकमेकांना मिठी मारली.

हे वाचा - VIDEO - दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ! आपसात लढता लढता 2 हरणं झाली बिबट्याची शिकार

ही घटना मलेशियाच्या टेरेंगगनूमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. आईला भेटण्यासाठी लेकीने जीव धोक्यात टाकल्याचा आणि मायलेकीच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Daughter, Mother, Parents and child, Rain flood, Viral, World news