व्हिडिओमध्ये चार मुलं स्टंट करताना दिसतात. यातील एक मुलगा दुरून पळत येतो आणि बॅक फ्लिफ परफॉर्म करतो. याआधीपासूनच इतर तीन मुलं तिथे उपस्थित असतात. हे तिघेही धावत येणाऱ्या मुलाच्या सेकंड लॉन्ग बॅक फ्लिपसोबतच आपली मूव्हमेंट सुरू करतात. विशेष बाब म्हणजे लॉन्ग फ्लिपमध्ये जोपर्यंत हा मुलगा त्यांच्यावरुन क्रॉस करतो, इतक्या वेळेत ही तिन्ही मुलं बॅक फ्लिप करत आपली पोजिशन अशा पद्धतीनं घेतात की कोणीही एकमेकांना धडकत नाही. 'हम दिल दे चुके सनम'! पतीनं प्रियकरासोबत लावलं पत्नीचं लग्न, वाचा लव्ह स्टोरी या जबरदस्त व्हिडिओला सोशल मीडियावर अनेकांची पसंती मिळत आहे. लोक हा व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करत आहेत. ट्विटरवर आतापर्यंत या व्हिडिओला 25 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, 4,200 वेळा हा व्हिडिओ रिट्विट केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनीच या चौघांचं कौतुक केलं आहे. एका यूजरनं लिहिलं, की यांचं टायमिंग आणि जिम्नास्टिक जबरदस्त आहे. मात्र, यासाठी त्यांनी भरपूर प्रॅक्टीस केली असेल. आणखी एका यूजरनं लिहिल, की मुलांनी सुंदर कोऑर्डिनेशन दाखवलं आहे.When you definitely understand the Law of Physics pic.twitter.com/mlQWBmddOB
— Amazing Physics (@amazing_physics) October 28, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.