मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कमोडमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच... ; पुढे काय झालं पाहा VIDEO

कमोडमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच... ; पुढे काय झालं पाहा VIDEO

टॉयलेटमध्ये गेल्यावर अचानक पॉटमध्ये रेप्टाईल अर्थात सरपटणारा प्राणी दिसला तर? असाच एक भयंकर प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : अनेकांसोबत विचित्र गोष्टी घडल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत असतात. असाच एक विचित्र, भयानक प्रकार समोर आला आहे. टॉयलेटमध्ये गेल्यावर अचानक पॉटमध्ये रेप्टाईल अर्थात सरपटणारा प्राणी दिसला तर? त्याक्षणी कोणीही घाबरुन तेथून पळ काढेल. असाच एक प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडला आहे.

फ्लोरिडामधील एक व्यक्ती घरातील टॉयलेटमध्ये गेला असता, समोर पाहिलेल्या दृष्याने त्याची पळता भुई थोडी झाली. दिसायला अतिशय विचित्र असणारा सरपटणारा प्राणी टॉयलेट पॉट उघडताच अचानक आतल्या आत उड्या मारु लागला. त्यानंतर त्या व्यक्तीने पॉट बंद करुन घेतला.

यूपीआय डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरिडातील एका घरातील टॉयलेटमध्ये एक घोरपड (Iguana) आढळली. सकाळी आपल्या बाथरुममध्ये गेलेल्या कर्ट हिल्बर्ट (Kurt Hilberth) यांनी टॉयलेट पॉटमध्ये सरपटणारा प्राणी पाहिला. त्यांनी सांगितलं, घोरपड इतकी मोठी होती, की ती पूर्णपणे पाण्यात डूबतही नव्हती. तिची शेपटी मागे-पुढे हलत होती. मी तिला पकडण्याचा प्रयत्नही केला, परंतु ती पॉटमध्ये आत-आत जात असल्याचं हिल्बर्ट यांनी सांगितलं.

ऐकावे ते नवल! एकाचं वर्षात ही महिला झाली 2 वेळा गर्भवती; दिला 4 बाळांना जन्म

" isDesktop="true" id="588472" >

Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल

काही वेळ घोरपडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अखेर बाहेरील सरपटणारे प्राणी पकडणाऱ्या व्यक्तीला बोलावलं. त्या घोरपडला पकडण्यासाठी येणारी माणसं येईपर्यंत टॉयलेट कमोड बंद ठेवण्यात आला होता. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर शेवटी घोरपडीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं.

First published:

Tags: Viral videos