मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - गाढ झोपलेल्या व्यक्तीला 2 महाकाय अजगरांनी घातला विळखा; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद

VIDEO - गाढ झोपलेल्या व्यक्तीला 2 महाकाय अजगरांनी घातला विळखा; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद

झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावर दोन अजगर चढले. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावर दोन अजगर चढले. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

झोपलेल्या व्यक्तीच्या शरीरावर दोन अजगर चढले. पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे.

  • Published by:  Priya Lad
तमुंबई, 30 मे : साप म्हटलं तरी धडकी भरते (Snake video viral). फक्त टीव्हीतच भलेमोठे अजगर पाहून अंगावर काटा येतो (Animal video viral). विचार करा, असा अजगर प्रत्यक्षात समोर असेल तर... किंबहुना टीव्हीत जसा अजगर माणसांवर अटॅक करतो, तसाच प्रत्यक्षात दिसला तर... फक्त कल्पनेच घाम फुटला ना? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहूनच तुमच्या अंगाचं पाणी पाणी होईल (Python on man while he sleeping). गाढ झोपलेल्या एका व्यक्तीला एक नव्हे तर दोन-दोन अजगरांनी विळखा घेतला आहे. दोन अजगर एकाच वेळी या व्यक्तीवर चढले आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. हे शॉकिंग दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती बेडवर शांत झोपली आहे. ही व्यक्ती इतकी गाढ झोपली आहे की तिच्यासोबत काय होतं आहे, हेसुद्धा समजत नाही आहे. हे वाचा - बापरे! श्वानाच्या तोंडात घुसला जगातील सर्वात विषारी साप; वाचवण्यासाठी मालकिणीने हात टाकला अन्... या झोपलेल्या व्यक्तीवर दोन महाकाय अजगर चढले. दोघांनीही त्याला विळखा घातला आहे. पिवळ्या रंगाचे हे अजगर ज्यांना पाहूनच आपल्याला घाम फुटला आहे. हे अजगर व्यक्तीच्या शरीरावरून सरपटत त्याच्या मानेपर्यंत जातात.  यानंतर पुढे जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. म्हणजे जरी हे अजगर माणसाच्या शरीरावर असले तरी त्या व्यक्तीला ते काहीच करत नाही आहेत.
snakebytestv नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिीडओ पोस्ट करण्यात आला आहे. सुदैवाने या अजगराने त्य व्यक्तीला काही केलं नाही आहे. व्हिडीओ पाहून हे अजगर पाळलेले आहेत, असं दिसून येतं. पण व्हिडीओ पाहून आपल्याला धडकी मात्र नक्की भरते. पांघरूणात आली मगर याआधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका व्यक्तीच्या पांघरूणात मगर आली होती. हा व्हिडिओ tangothedwarfcaiman नावाच्या युझरने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मी या मगरीला नीट जवळ घेतल्याशिवाय मला झोप लागत नाही. टोगो असे या मगरीच्या पिल्लाचं नावं. इन्स्टाग्राम युझरच्या म्हणण्यानुसार, मगरीचे पिल्लू दररोज पलंगावर येते आणि त्यांना KISS करून पुन्हा टाकीमध्ये जाते. हे वाचा - माकडांचा वर्ग झाला सुरू, तरुणाने शिकवलं अ..आ; मजेशीर Viral Video ही मगर फार प्रेमळ असली तरी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिल्यानंतर काळजात धस्स होतं असं अनेक युझर्सनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Python, Python snake, Snake, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या