• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पार्कमध्ये मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक झाली सिंहाची एण्ट्री अन्..., पाहा VIDEO

पार्कमध्ये मस्ती करत होते लोक; इतक्यात अचानक झाली सिंहाची एण्ट्री अन्..., पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये दिसतं की सिंहाला (Lion in Park) पाहून कोणीही घाबरत नाही. आता तुम्हीही विचारात पडला असाल की असं कसं शक्य आहे. तर हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांच्या व्हिडिओला (Viral Videos of Animal) भरपूर पसंती मिळते. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही हैराण करणारे. जंगलाचा राजा असलेल्या सिंहाला समोर बघताच सर्वांचाच थरकाप उडतो. सिंह अगदी दूरही असला तरीही त्याला पाहूनच धडकी भरते. अनेकदा सिंहाचे अजब व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या समोर आलाले एक व्हिडिओही अतिशय मजेशीर आणि पहिल्या नजरेत हैराण करणारा आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं की सिंहाला (Lion in Park) पाहून कोणीही घाबरत नाही. आता तुम्हीही विचारात पडला असाल की असं कसं शक्य आहे. तर हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याला म्हणतात रुबाब; हत्तीच्या पिल्लाला मिळाली Z प्लस सुरक्षा, पाहा Viral Video सिंहाला समोर पाहून कोणालाही भिती वाटेल मात्र एखादा कुत्रा सिंह बनून तुमच्यासमोर आला तर? बहुतेकजण त्याला घाबरणार नाहीत. सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, तो असाच आहे. या दिसतं की एका पार्कमध्ये अनेक लोक बसलेले आहेत. इतक्यात तिथे एक सिंहाची एण्ट्री होते. मात्र, त्याला पाहून कोणीच घाबरत नाही. जगात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या डोक्याचा वेगळ्या पद्धतीनं वापर करत शक्कल लढवून मजेशीर काहीतरी करतात.
  View this post on Instagram

  A post shared by Panda (@dailygameofficial)

  कोणीतरी या कुत्र्यासोबतही असंच केलं आहे. या कुत्र्याला सिंहाप्रमाणे तयार करून लोकांना घाबरवण्यासाठी पार्कमध्ये सोडण्यात आलं. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताना कुत्रा अगदी सिंहाप्रमाणेच दिसतो. मात्र निरखून पाहिल्यावर सत्य समजतं. 12 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा सिंह बनून अतिशय आरामात पार्कमध्ये फिरत आहे. लांबून पाहिल्यावर तो अगदी सिंहासारखाच दिसतो. मात्र, जवळून पाहिल्यावर लगेचच तुमच्या लक्षात येईल, की हा कुत्रा आहे. पार्कमधील लोकांसोबतही असंच घडलं. हे लोक या कुत्र्याला घाबरले नाहीत तर जवळ येऊन कुत्र्याला कुरवाळू लागले. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही dailygameofficial नावाच्या पेजवर पाहू शकता. ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा धुमाकूळ व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अॅडमिनने लिहिलं, की हे देवा हे काय आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: