जीव धोक्यात घालून युवकांनी केले भयंकर बाईक स्टंट; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

जीव धोक्यात घालून युवकांनी केले भयंकर बाईक स्टंट; VIDEO पाहून येईल अंगावर काटा

बाईकवर, कारवर किंवा अन्य वस्तूंवर अनेकदा इतके भयंकर स्टंट केले जातात, की ते पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो. नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही (Viral Video of Bike Stunt) तुम्हाला हेच पाहायला मिळेल.

  • Share this:

­नवी दिल्ली 20 जून : आजकाल लोक प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी अगदी काहीही करायला तयार असतात. काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात अनेकदा हे लोक आपला जीवही धोक्यात घालतात. हैराण करणारी गोष्ट म्हणजे यात अनेकांचा मृत्यूदेखील होतो. सध्याच्या तरुण पिढीमध्ये स्टंटचं (Stunt) किती क्रेझ आहे, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. बाईकवर, कारवर किंवा अन्य वस्तूंवर अनेकदा इतके भयंकर स्टंट केले जातात, की ते पाहूनच आपल्या अंगावर काटा येतो. नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही (Viral Video of Bike Stunt) तुम्हाला हेच पाहायला मिळेल.

स्टंटचे अनेक व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील. मात्र, काही व्हिडिओ असे असतात जे पाहाणाऱ्यांनाही हैराण करतात. अशा परिस्थितीत हा स्टंट करणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल, याचा तर अंदाज लावणंही अवघड आहे. मात्र, या लोकांच्या चेहऱ्यावर असे कोणतेही घाबरलेले हावभाव नसतात. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं, की हा स्टंट करण्यासाठी ते आपला जीव धोक्यात घालायलाही तयार आहेत. तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, की कशाप्रकारे लोक निरनिराळे स्टंट करत आहेत.

विश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही वेळासाठी का होईना, पण तुम्हाला भीती वाटली असेल. कारण हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅफॉर्मवर अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर केले जातात. ट्विटरवर हा व्हिडिओ इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं, की आश्चर्यकारक पराक्रम. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींना हा व्हिडिओ चांगलाच आवडला आहे तर काही नेटकरी हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट करून नक्की सांगा.

Published by: Kiran Pharate
First published: June 20, 2021, 7:50 AM IST

ताज्या बातम्या