मुंबई 01 फेब्रुवारी : अनेक अपघाताचे व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. हे व्हिडीओ कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तर कधी खूपच धोकादायक असतात. पण असे हे अपघाताचे व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या एक असा अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो थरकाप उडवणारा आहे. असा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहिला असेल.
एका महिलेचा जीव काही सेकंदाच्या फरकाने वाचला आहे, नाहीतर या महिलेच्या शरीराचे तुकडे झाले असते. या महिलेनं एक जरी पाऊल टाकलं असतं तर सगळा खेळच संपला होता. पण या महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. नशीब चांगलं असेल तर तुमचं कोणी काहीच करु शकत नाही, हा व्हिडीओ पाहून तुम्ही हेच म्हणाल.
हे ही पाहा : तरुणीने कॅब बुक करताच, ड्रायव्हरचा असा मेसेज... दुसऱ्याच क्षणी कॅन्सल केली राईड
तसं म्हणायला गेलं तर, आपलं घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण या महिलेसोबत तिच्या घरातच धक्कादायक प्रकार घडला आहे.
ही घटना अमेरिकेतील आहे, येथे रविवारी रात्री एका घरावर मोठा दगड पडला, हा दगड इतक्या जोरात आला की समोर असलेल्या सगळ्याच गोष्टींचा चुरा करत तो पुढे आला. ही महिला देखील त्या दगडाच्या वाटेत होती. पण काही सेकंदाच्या फरकाने या महिलेचे प्राण वाचले आहे.
नक्की काय घडलं? हे या व्हिडीओत पाहा
A massive boulder smashed through a home in Palolo Valley almost hitting the owner inside. @KHONnews #news#breakingnews#hawaii#khon2news pic.twitter.com/KGoVLXeaDJ
— Max Rodriguez (@maxrrrod) January 30, 2023
या घरावर सुमारे 5 फूट उंचीचा आणि रुंदीचा दगड पडल्याची घटना रात्री 11.45 वाजता घडली. दगड घरात घुसल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना रेकॉर्ड झाली. भिंत तोडून बेडरुममधून दगड त्यांच्या लिविंग रुममध्ये घुसला. ही धक्कादायक घटना घरातील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रात्री उशिरा टीव्ही पाहण्यासाठी सोफ्याकडे जात असताना कॅरोलिन सासाकी नावाची एक महिला कशीबशी वाचली आहे.
या घटनेबद्दल बोलताना कॅरोलिन सासाकीने मीडियाला सांगितले की, "मला एक मोठा आवाज ऐकू आला आणि दगड माझ्या समोरून गेला, पण याबद्दल मला काहीही माहित नव्हते, घटनेच्या काही सेकंदापर्यंत मला कळलं देखील नाही की माझ्यासोबत नक्की काय घडलं?
हा दगड कशामुळे कोसळला हे स्पष्ट नाही, परंतु असा अंदाज आहे की हवाईमध्ये मुसळधार पावसामुळे त्याची माती खचली किंवा वाहून गेली असावी, ज्यामुळे हा प्रकार घडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral