आईच्या डोळ्यासमोर 3 महिन्याच्या बाळाचा अपघात, हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ VIRAL

आईच्या डोळ्यासमोर 3 महिन्याच्या बाळाचा अपघात, हृदयाचे ठोके चुकवणारा व्हिडीओ VIRAL

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बेबी प्रॅममधून (baby pram) छोट्या बाळाला घेऊन जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्या प्रॅमला जोरदार धडक दिली आहे

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला बेबी प्रॅममधून (baby pram) छोट्या बाळाला घेऊन जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने त्या प्रॅमला जोरदार धडक दिली आहे. यानंतर हवेत उडालेली प्रॅम पाहताना हृदयाचे ठोके चुकतात. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ युक्रेनमधील असून 7 फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. डॅश कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झाली आहे. या बाळाचं वय अवघ्या 3 महिन्यांचं आहे.

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेल्या एका कारमध्ये ही घटना कैद झाली आहे. एक महिला आपल्या बाळाला बेबी प्रॅममध्ये ठेवून रस्ता क्रॉस करत आहे. मात्र भरधाव येणारी गाडी पाहून भांबावल्याने ती मध्येच थांबते. यामध्ये गाडीचा जोरदार धक्का बेबी प्रॅमला बसल्याचे प्रॅम उंच हवेत उडते. 7 न्यूज ऑस्ट्रेलियाने फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हृदयाची ठोके चुकवणारी ही घटना पाहिल्यानंतर अपघातग्रस्त मुलाबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या भीषण अपघातानंतरही हे बाळ वाचलं आहे. आपल्या मुलाचा अपघात उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या आईने खचून न जाता त्या मुलाला हॉस्पीटलमध्ये भरती केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मुलाची प्रकृती स्थीर असल्याचं सांगितलं. त्यामुळे या घटनेला आपण एक चमत्कारच म्हणू शकतो. या मुलाच्या आईचं नाव Maria Tkachenko आहे. गाडीचा चालक दारुच्या नशेत असल्याची माहिती त्यांनीच स्थानिक पत्रकारांना दिली. भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचा चालक नशेमध्ये गाडी चालवत होता. त्यामुळे त्याला किमान 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2020 07:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading