Home /News /viral /

बापरे बाप! शेतात घुसला तब्बल 13 फूट King Cobra; हातानेच पकडला आणि...

बापरे बाप! शेतात घुसला तब्बल 13 फूट King Cobra; हातानेच पकडला आणि...

व्यक्तीने हातात धरलेल्या इतक्या मोठ्या किंग कोब्राला पाहूनच धडकी भरते.

    अमरावती, 10 मे : साप म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो. साप समोर आला की तोंडातून शब्द फुटत नाही. साधे छोटे छोटे साप पाहिले तरी भीती वाटते. पण सध्या अशा सापाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो तब्बल 13 फूट लांब आहे. हा साप साधसुधा नाही, तर खतरनाक विषारी असा किंग कोब्रा आहे. एका शेतकऱ्याच्या शेतात हा साप घुसला. त्यानंतर एका व्यक्तीने हातानेच या सापाला पकडलं आहे (King cobra snake). आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका व्यक्तीने तब्बल 13 फूट लांब किंग कोब्रा (King Cobra)  पकडला आहे. एका शेतकऱ्याच्या ताड तेलाच्या बागेत हा हा भयंकर साप घुसला होता. शेतकऱ्याने ईस्टर्न घाट वाइल्डलाइफ सोसायटीला संपर्क केला. त्यानंतर या इतक्या मोठ्या सापाला पकडण्यात आलं. हे वाचा - चला पाहूया किती तीक्ष्ण आहे तुमची नजर! शोधून काढा या PHOTO मध्ये दडलेले शब्द डीडी न्यूज आंध्रने या सापाचा फोटो सोशल मीडियावर ट्विट केला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार सैदाराव नावाच्या शेतकऱ्याच्या बागेत हा 13 फूट लांब किंब कोब्रा घुसला. ईस्टर्न घाट वाइल्डलाइफ सोसायटीला याची माहिती देण्यात आली. तिथून व्यंकटेश नावाची साप पकडणारी व्यक्ती तिथं आली. व्यंकटनेशनने हातानेच साप पकडला. या इतक्या मोठ्या सापाला पकडून एका गोणीत टाकण्यात आलं. त्यानंतर त्याला वंतलामिडी वनक्षेत्रात सोडण्यात आलं. रिपोर्टनुसार ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही वर्षांपासून इथं असे विषारी साप मानवी वस्तीत दिसून येतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Andhra pradesh, Snake, Viral, Viral news, Viral photo, Wild animal

    पुढील बातम्या