Home /News /viral /

VIDEO - सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा सलूनमधील VIDEO; शेवटी आहे जबरदस्त ट्विस्ट

VIDEO - सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा सलूनमधील VIDEO; शेवटी आहे जबरदस्त ट्विस्ट

सलूनमध्ये असं काही घडलं की सुरुवातीला तुम्हाला धडकी भरेल पण नंतर हसू आवरणार नाही.

  मुंबई, 01 मे :  सध्या सोशल मीडियावर एका सलूनचा व्हिडीओ (Salon video) जबरदस्त व्हायरल होतो आहे. या सलूनमध्ये असं काही घडलं की ग्राहकांना दरदरून घाम फुटला. हजामत करायला आलेल्या सर्व ग्राहकांनी तिथून पळ काढला. काही क्षणातच भरलेलं सलून रिकामं झालं.सुरुवातीला तुम्हालाही धडकी भरेल पण या व्हिडीओच्या शेवटी असा जबरदस्त  ट्विस्ट आहे की तुम्हाला हसू आवरणार नाही (Salon prank video). बरेच लोक केस कापायला आणि दाढी करायला या सलूनमध्ये आले आहेत. काहींची हजामत होते आहे तर काही जण प्रतीक्षा करत एका ठिकाणी शांत बसले आहेत. इतक्यात एक उंच, धिप्पाड व्यक्ती सलूनमध्ये संतप्त होऊन ओरडत घुसते. एका हेअरस्टाइलिस्टवर ती व्यक्ती ओरडते. हेअरस्टाइलिस्ट एका ग्राहकाचे केस कापत असतो तोसुद्धा त्या व्यक्तीला पाहून आपलं काम थांबतो. ती व्यक्ती इतक्या मोठ्याने ओरडत सलूनमध्ये घुसते की आधीच सर्वजण घाबरतात आणि तिच्याकडे एकटक पाहत असतात. हे वाचा - VIDEO - सायकलवर स्टंट करत होता लहान मुलगा; अचानक निघालं सायकलचं चाक आणि... जेव्हा ती व्यक्ती हेअरस्टालिस्टजवळ पोहोचते तेव्हा खूप भ़डकलेली असते. रागात ती आपल्या बॅगेत हात टाकते, तेव्हा सर्वांना धडकी भरते, घाम फुटतो. एकही सेकंद तिथं न थांबवता सर्वजण तिथून पळ काढता. पळता पळता काही जण जमिनीवर पडतातही. आपली हजामत कधी होईल याची प्रतीक्षा करणारे ग्राहकच नव्हे तर ज्यांची हजामत होत होती ते ग्राहकसुद्धा खुर्चीतून उठून त्याच अवस्थेत पळून जातात.
  व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहाल व्यक्तीने बॅगेतून जे काढलं ते दुसरंतिसरं काही नाही तर एक मोबाईल आहे. त्याने आपल्या बॅगेतून मोबाईल बाहेर काढला. पण त्याने बॅगेत हात टाकताच सर्वांना वाटलं की तो बंदूक काढतो आहे की काय? त्यामुळेच जसं त्याने बॅगेत हात टाकला तसं सर्वांनी आपला जीव वाचवण्यासाठी धडपड केली. तो बॅगेतून काय काढतो आहे किंवा त्याच्या हातात काय आहे हे कुणीही पाहिलं नाही. हे वाचा - VIDEO: व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळला व्यक्ती; पुढे जे केलं ते पाहून खळखळून हसाल @consertasmart_novasuissa इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. खरंतर सलूनमधील हा एक प्रँक व्हिडीओ आहे. हा प्रँकच असा करण्यात आला आहे, आपल्यालाही काही क्षण सर्वकाही खरंच घडत आहे, त्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूकच असावी असंच वाटलं. पण विचार करा तिथं असलेल्या ग्राहकांची काय अवस्था झाली असेल.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या