दुःख आहे की आनंद हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर meemlogy नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, लोक आनंदी आहेत की दुःखी? सहसा कोणी मरण पावलं की लोक शोक करतात. पण इथे उलटंच दृश्य दिसलं. जणू मृत्यूचा आनंद साजरा केला जात होता. हा व्हिडीओ कुठचा आहे हे माहीत नाही, पण अशी श्रद्धांजली सभा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. लोकांच्या मजेदार कमेंट्स हा व्हिडिओ आधीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पुन्हा एकदा तो शेअर करण्यात आला, तिथून तो आता व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिलं की, अशी श्रद्धांजली सभा पाहून स्वर्गातील आत्मेही नाचू लागतील. तर आणखी एकाने आपलीही अशाच प्रकारची श्रद्धांजली सभा असावी, असं म्हटलं आहे. अनेकांनी आपल्या मित्रांना टॅग करून अशीच श्रद्धांजली सभा ठेवण्याची मागणी केली.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Video viral