मुंबई, 11 मार्च : डान्सर गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रात गाजतंय. गौतमीनं तिच्या डान्सनं तिचा एक वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. अनेकदा टीका झाल्यानंतर आता सुधारलेल्या गौतमीला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. चक्क महिला देखील आता गौतमीच्या प्रेमात पडल्या आहेत. पण गौतमीच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी काही कमी झालेली नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमीला पाहण्यासाठी गर्दी होतेय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील लहान मोठ्या कार्यक्रमांना गौतमीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. गौतमी सध्या चांगलीच जोमात आहे आणि आता साताऱ्यात एका खास वाढदिवसानिमित्त गौतमीचा कार्यक्रम होतोय.
हौसेला मोल नसंत असं म्हणतात. काही दिवसांआधी मुलाच्या पाचव्या वाढदिवसाला खोडेवाडी येथे एका बापानं गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. गौतमीनं त्या चिमुकल्याच्या वाढदिवसाला हजेरी लावत कार्यक्रम सादर केला. या वाढदिवसाची महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर आता आणखी एका कार्यक्रमाची तितकीच चर्चा रंगणार आहे. कारण आता बैलाच्या वाढदिवसाला एका पैलवानानं गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
हेही वाचा - Gautami Patil: गौतमी पाटीलला मिळाली मराठीतील 'या' अभिनेत्याची साथ;चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
साताऱ्यातील बैलगाडा मालक आणि पैलवान असलेल्या सतीश भोसले यांनी आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीच्या कार्यक्रमाचा आयोजन केलंय. साताऱ्यातील जावली येथील खर्शी गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. बैलाच्या वाढदिवसाला संध्याकाळी 7 वाजता गौतमी तिथे उपस्थित राहणार आहे. सातारकरांना पुन्हा एकदा गौतमीचा जलवा पाहायला मिळणार आहे. साताऱ्यात या कार्यक्रमाला तुफान गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपल्या बैलाच्या वाढदिवसाला गौतमीचा डान्स आयोजित करणारा पैलवान सतीश भोसले यांचा बैल हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याच्यासाठी त्याचा बैल खूप खास असून त्याच्याच वाढदिवसाला त्यानं गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
गौतमी पाटील अश्लील डान्स करते म्हणून तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. तिच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची देखील मागणी करण्यात आली होती. टीका झाल्यानंतर गौतमीनं स्वत:मध्ये बदल करून ती पुन्हा तिचे कार्यक्रम करू लागली आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांआधीच गौतमीची बदनामी करण्याच्या हेतूनं तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
View this post on Instagram
महिला दिनानिमित्त पुण्यात महिलांनी खास गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे गौतमीचा सत्कार करण्यात आला. गौतमीला पाहण्यासाठी चक्क महिलांनी तुफान गर्दी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil, Marathi entertainment, Social media, Video viral