• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • दिलजीत दोसांझच्या गाण्यावर 63 वर्षीय आजीबाईचे जबरदस्त ठुमके; डान्स पाहून नेटकरी फिदा, VIDEO

दिलजीत दोसांझच्या गाण्यावर 63 वर्षीय आजीबाईचे जबरदस्त ठुमके; डान्स पाहून नेटकरी फिदा, VIDEO

आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video of Old Lady) झाला आहे. या गाण्यात त्या दिलजीत दोसांझच्या लव्हर गाण्यावर ठुमके लगावताना दिसतात

 • Share this:
  नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : तुम्हाला कधी असं वाटतं का की वय झाल्यामुळे आपण आपली हौस किंवा छंद आता पूर्ण करू शकत नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही 63 वर्षीय बाला शर्मा उर्फ डान्सिंग दादीकडून प्रेरणा घ्यायला हवी. या आजीबाई या वयातही आपली हौस पूर्ण करत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) सध्या या डान्सिंग दादीला (Dancing Grandma) चांगलीच पसंती मिळत आहे. नवीन-जुन्या गाण्यांवर या आजीबाईच्या ठुमक्यांनी सगळ्यांचंच मन जिंकलं आहे. यामुळे आता ही आजीबाईही स्टार बनली आहे. सध्या आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Dance Video of Old Lady) झाला आहे. या गाण्यात त्या दिलजीत दोसांझच्या लव्हर गाण्यावर ठुमके लगावताना दिसतात. हा व्हिडिओ सर्वांचंच मन जिंकत आहे. यावेळी रवि बाला शर्मा यांनी दिलजीत दोसांझच्या लव्हर या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. रविवारी पोस्ट केला गेलेला हा व्हिडिओ 44k हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. असं म्हटलं जातं की वय हा केवळ एक आकडा आहे आणि याच गोष्टीचा प्रत्यत ६३ वर्षीय आजीबाईंनी दिला आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आजीबाईंनी टी-शर्ट आणि पँटसोबत स्वेटशर्ट घातलेलं आहे. व्हिडिओमध्ये त्या अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ याने गायलेल्या गाण्यावर खास हावभाव देत आहेत.
  दिलजीत दोसांझचं लव्हर हे गाणं आतापर्यंत 48 मिलियनहून अधिकांनी पाहिलं आहे. कमेंट कमेंट सेक्शनमध्ये रवि बाला शर्मा यांच्या डान्सचं कौतुक अनेकांनी केलं आहे. या वयातही त्यांचा उत्साह सर्वांनाच अचंबित करणारा आहे. रवि बाला शर्मा इंटरनेटवर भरपूर प्रसिद्ध आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या अनेकदा आपले डान्स व्हिडिओ शेअर करत असतात. अनेकदा त्या नव्या-जुन्या गाण्यांवर डान्स करत हे व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर अपलोड करतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते. सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या व्हिडिओवरही अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, या वयातही आजीबाईंनी कमाल केली. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, तुमचा डान्स खरंच खूप खास आहे. तर आणखी एकानं लिहिलं, मला खात्री आहे, की दिलजीत दोसांझलाही हा व्हिडिओ खूप आवडला असेल. सोशल मीडियावर अनेकांनी आजीबाईंच्या या व्हिडिओचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: