लग्नानंतर आनंद गगनात मावेना; रस्त्यावरच नाचू लागले नवरी-नवरदेव, जबरदस्त Dance Video
लग्नानंतर आनंद गगनात मावेना; रस्त्यावरच नाचू लागले नवरी-नवरदेव, जबरदस्त Dance Video
सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेव आणि नवरी आपल्या लग्नानंतर जबरदस्त डान्स (Dance Video of Bride and Groom) करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली 19 सप्टेंबर : भारतात लग्न (Indian Wedding) हे एखाद्या मोठ्या सणाप्रमाणेच केलं जातं. यात भरपूर दिवसांपासून सुरू असलेले वेगवेगळे कार्यक्रम, खाणं-पिणं, महाग कपडे, ज्वेलरी, डान्स असं बरंच काही असतं. आजकाल सोशल मीडियावर भारतीय लग्नांतील भरपूर व्हिडिओ व्हायरल (Indian Wedding Viral Video) झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ मस्तीचे तर काही भावुक (Emotional Videos) करणारे असतात. सोशल मीडियावर (Social Media) सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरदेव आणि नवरी आपल्या लग्नानंतर जबरदस्त डान्स (Dance Video of Bride and Groom) करताना दिसत आहेत.
शेतकऱ्यानं केली कमाल; एकाच फांदीवर 839 टोमॅटोचं उत्पादन घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड
इन्स्टाग्रामवर व्हायरल (Instagram Reels) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरी आणि नवरदेव रस्त्याच्या कडेला उभा आहेत. काही वेळानं अचानक ते दोघंही डान्स करू लागतात. नवरी आणि नवरदेवाचा हा जबरदस्त डान्स आणि आनंद पाहून शेजारचे लोकही हसू लागतात. ढोल आणि गाण्यांवर नाचणाऱ्या या नवरदेव आणि नवरीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
61 वर्षाच्या BF ला घरी घेऊन गेली 19 वर्षीय तरुणी; कुटुंबीयांनी उचललं मोठं पाऊल
नवरीबाईचा हा स्ट्रीट डान्स लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये नवरीबाईचा संपूर्ण चेहरा दिसत नाही. मात्र, तिचे डान्स मूव्ह पाहूनच जाणवतं की ती किती आनंदात आहे. या व्हिडिओ भरपूर लाईक मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत नवरीच्या डान्सचं कौतुकही केलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.