मराठी बातम्या /बातम्या /Viral /

देशातील प्रसिद्ध मंदिरातील महिलेचा Dance Video पाहून पुजारी संतापले; हिंदू संघटनांनीही नोंदवला आक्षेप

देशातील प्रसिद्ध मंदिरातील महिलेचा Dance Video पाहून पुजारी संतापले; हिंदू संघटनांनीही नोंदवला आक्षेप

VIRAL VIDEO : अभिनेता सलमान खान याच्या गाण्यावर ही महिला मंदिरात डान्स करताना दिसत आहे. हिंदू संघटनांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे.

VIRAL VIDEO : अभिनेता सलमान खान याच्या गाण्यावर ही महिला मंदिरात डान्स करताना दिसत आहे. हिंदू संघटनांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे.

VIRAL VIDEO : अभिनेता सलमान खान याच्या गाण्यावर ही महिला मंदिरात डान्स करताना दिसत आहे. हिंदू संघटनांनीही यावर आक्षेप नोंदवला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मध्य प्रदेश, 9 ऑक्टोबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) छतरपुरमध्ये एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral On Social Media) व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओमुळे महिलेला अनेकांचा विरोध सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या जगातील प्रसिद्ध मंदिरात (Flimy Dance In Temple) एका बॉलिवूड गाण्यावर व्हिडीओ शूट केला. त्यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा मंदिराच्या गेटवर एका बॉलिवूड गाण्यावरील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमुळे मोठा वाद सुरू झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जगातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरातील (Dance video of a woman in the world famous Mahakaleshwar temple) असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महिलेने एका फिल्मी गाण्यावर व्हिडीओ शूट करीत तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाकाल मंदिराचे पंडित आणि पुजाऱ्यांनी याला आपत्तीजनक असल्याचं सांगितलं आहे. या महिलेला मंदिरात प्रवेश दिला जाऊ नये अशी त्यांनी मागणी केली आहे. महाकालेश्वर मंदिरात शूट केला गेलेला हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे ही वाचा-मेट्रोच्या खाली 68 वर्षीय महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव या व्हिडीओमध्ये महिला चित्रपटातील गाण्यावर ("रग-रग में इस तरह तू समाने लगा') डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ महाकालेश्वर ज्योतिर्लिंगच्या वर उभारलेल्या ओंकारेश्वर मंदिराच्या पिलरजवळ शूट केला आहे. महिला या पिलर्समध्ये डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकजण विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर काही हिंदू संघटनांनी या व्हिडीओवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मंदिरात अशा प्रकारे डान्स करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला हवी. महाकाल मंदिराचे वरिष्ठ पंडीत महेश पुजारी यांनी सांगितलं की, हा व्हिडीओ आक्षेपार्ह आहे. देवाच्या ठिकाणी अशा प्रकारे फिल्मी गाण्यांवर प्रदर्शन करणं अजिबात योग्य नाही.     
First published:

Tags: Dance video, Temple, Viral video on social media

पुढील बातम्या