सॅल्युट! गर्दीत बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाचा RPF जवानानं वाचवला जीव

सॅल्युट! गर्दीत बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाचा RPF जवानानं वाचवला जीव

दादर लोहमार्ग पोलिसांनी वाचवला प्रवाशाचा जीव, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च : दादर रेल्वे स्थानक तसं गर्दी आणि गजबजलेलं. मात्र या रेल्वे स्थानकात गर्दीतून वाट काढत खाकी वर्दीतील पोलिसांनी एका तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन वेगवेगळ्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळात असतं. असाच एक प्रसंग दादरमध्ये घडला. खांद्यावर उचलून घेऊन या तरुणाला पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील वैद्यकीय मदत केंद्रात दाखल केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचं सोशल मीडियापासून ते प्रवाशांपर्यंत सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. दादरच्या फलाट क्रमांक 1 वर आलेल्या लोकलमध्ये प्रवासी चक्कर येऊन पडला होता. प्रवाशांनी लोहमार्ग पोलीस दलाला याची माहिती देताच तिथल्या काही प्रवाशांच्या मदतीनं त्यांनी या तरुणाला खांद्यावरून रेल्वे स्थानकातील आरोग्य विभागात नेलं. फलाट क्रमांक एक ते 6 पोलिसानं या बेशुद्ध प्रवाशाला खांद्यावरून घेऊन जात प्राथमिक उपचारासाठी तत्काळ दाखल केलं होतं.

हे वाचा-महाराष्ट्रातल्या तरुणांचं 'जय जवान',  तीन वर्षात 11 हजर तरुण लष्कारत दाखल

त्यानंतर पोलिसांनी या प्रवाशाच्या घरच्यांना फोन करून माहिती दिली आणि त्यांना बोलवून घेतलं आणि प्रवाशाला प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या ताब्यात दिलं आहे. प्रवाशाच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 9 फेब्रवारीचा असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या पोलिसाचं तुफान कौतुक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-तुमचं Facebook Account दुसरं कोणी वापरत नाही ना? असं करा चेक

First published: March 12, 2020, 11:01 AM IST
Tags:

ताज्या बातम्या