पाटना, 31 जानेवारी : बिहारमधील (Bihar News) पश्चिमी चंपारण्यमधील एका वृद्धाने आपल्या नातवाच्या जन्मदिनी आयोजित पार्टीत दारूची रिकामी बाटली घेऊन डान्स सुरू केला. त्यांना हे करणं महागात पडलं आहे. या कार्यक्रमातील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अॅक्शनमध्ये आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या शिकरापूर पोलीस ठाणे हद्दीतील गावात एका 60 वर्षीय रमेश सिंह यांनी आपल्या नातवाच्या जन्माच्या आनंदात एका ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं होतं.
आजोबांनी रिकामी बाटली घेऊन केला डान्स..
मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात महिला डान्सर 'शराबी' चित्रपटातील गाण्यावर डान्स करीत होती. गाणं ऐकून आजोबा स्वत:ला रोखू शकले नाही आणि रिकामी बाटली घेऊन स्टेजवर चढून डान्स करू लागले. प्रेक्षकांनीही आजोबांचा हा डान्स इन्जॉय केला. काहींनी तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. शेअर करताच हा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसही सक्रीय झाले.
हे ही वाचा-79 दिवसांपासून फक्त कच्च मांस खातोय हा व्यक्ती; कारण जाणून व्हाल शॉक
सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल..
शिकारपुरच्या पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशावर रमेश सिंहला रविवारी अटक करण्यात आली. ही घटना 16 जानेवारीची असल्याचं सांगितलं जात आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पोते की छठी पर खुश दादा ने शराब की बोतल लेकर किया जमकर डांस लोग कहते है मैं शराबी हूं 😂🙆☺️😊 pic.twitter.com/eWXNGo5HeS
— सुपर कठोर सिंह जी 🇮🇳 (@TheReal_Singh_) January 31, 2022
गाण्याची नक्कल करणं पडलं भारी
आरोप आहे की, या कार्यक्रमात कोरोना प्रोटोकॉचं उल्लंघन झालं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, या कृत्यातून दारू पिण्याला पाठिंबा दिला जात आहे. स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं की, आजोबा रिकामी बाटली घेऊन डान्स करीत होते. तरी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Viral video on social media