मुंबई, 6 मार्च : अनेकदा तुमच्यासोबत असं घडलं असेल, की तुम्ही ओळखीतल्या एखाद्या माणसाला पूर्ण टक्कल केलेलं पाहिलं आणि त्याला ओळखूच शकला नाहीत. दोन लहान मुलांसोबत असंच घडलं. (Instagram viral video)
ही लहान मुलं थेट आपल्या वडिलांनाच ओळखू शकली नाहीत. त्यांनी पहिल्यांदा आपल्या वडिलांना टक्कल केलेलं पाहिलं. ते आश्चर्यचकित होत पाहू लागले आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून तर तुम्ही हसू रोखूच शकणार नाही. (Instagram video with small baby)
हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर @Aqualady नावाच्या युजरनं शेअर केलं आहे. सोबतच त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'जेव्हा दोन जुळ्या मुलांनी आपल्या वडिलांना पहिल्यांदा टकलू झालेलं पाहिलं. तेव्हा दोघांची प्रतिक्रिया तर पाहा!'
Father shaved for the very first time, watch his twin kids reaction reaction pic.twitter.com/6MJOlFSSCI
— Aqualady (@Aqualady6666) March 4, 2021
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की दोन जुळी मुलं बसली आहेत आणि त्यांच्यासमोर त्यांचे वडील बसलेत जे टकलू आहेत. मुलांनी पहिल्यांदा वडिलांना टकलू झालेलं पाहिलं तेव्हा ते डोळे फाडून-फाडून त्यांना पाहतच राहिले. (Instagram dad and babies video)
(वाचा VIDEO: LIVE TV वर देशाला उद्देशून भाषण करताना पंतप्रधान अडखळतात तेव्हा...)
काही वेळाने जेव्हा त्यांना वडिलांना ओळखताच आलं नाही तेव्हा, ते जोरजोरात रडू लागले... (Instagram bald dad and babies video)
(वाचा भीती जेव्हा होते असह्य... बिथरलेली महिला डॉक्टरांना चावली)
मुलांच्या या क्युट व्हिडीओला लोकांची मोठी पसंती मिळते आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला आहे. शिवाय 1 लाख लोकांनी त्याला लाईक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Father, Instagram, Small baby, Video Viral On Social Media, Viral video.