मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Dancing डब्बू अंकल पुन्हा एकदा Hit, सोशल मीडियावर हिट्सचा पाऊस, पाहा Viral Video

Dancing डब्बू अंकल पुन्हा एकदा Hit, सोशल मीडियावर हिट्सचा पाऊस, पाहा Viral Video

प्रो. संजीव श्रीवास्तव (Prof. Sanjeev Shrivastav) उर्फ डब्बू अंकल (Dabbu Uncle) पुन्हा एकदा व्हायरल (Viral) झालेत.

  • Published by:  desk news
भोपाळ, 15 जुलै : प्रो. संजीव श्रीवास्तव (Prof. Sanjeev Shrivastav) उर्फ डब्बू अंकल (Dabbu Uncle) पुन्हा एकदा व्हायरल (Viral) झालेत. गोविंदाच्या ‘मै से मीना से ना साकी से’ या गाण्यावर डब्बू अंकलनी आपला परफॉर्मन्स (dance performance) दिला आणि बघता बघता लाखो चाहत्यांनी हा व्हिडिओ पाहिला. यापूर्वीदेखील डब्बू अंकल याच गाण्यावर थिरकले होते. मात्र त्यावेळी गाण्याच्या एकाच कडव्यावर डान्स करताना ते दिसले होते. या व्हिडिओत मात्र पूर्ण गाण्यावर (Full Song) त्यांनी डान्स केला आहे. व्हिडिओ झाला व्हायरल एका कार्यक्रमात डब्बू अंकल डान्स करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीनंदेखील गाण्यावर ठेका धरला आहे. या व्हिडिओत डब्बू अंकल यांच्या वेगवेगळ्या स्टेप्सना उपस्थितांमधून जोरदार दाद मिळत असल्याचं दिसतं. हे वाचा -बाईक चालवण्याची हौस तरुणीला पडली भारी! स्कूटी सोडून थेट बुलेटवरच बसली आणि... लहानपणापासून आवड मध्य प्रदेशातील विदिशामध्ये संजीव श्रीवास्तव हे एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांमध्ये ते डब्बू अंकल म्हणून प्रसिद्ध आहेत आणि एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे. डब्बू अंकलना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगचा शेवटचा परफॉर्मन्स हा आपला असायचा, असं ते सांगतात. गोविंदा, मिथून चक्रवर्ती आणि जावेद जाफरी हे आवडते डान्सर्स असून त्यांच्या गाण्यावर नृत्य करायला आपल्याला आवडतं, असंही ते म्हणतात. यापूर्वी वेगवेगळ्या डान्स स्पर्धांमध्ये ते सहभागी व्हायचे. मात्र आता त्यांनी स्पर्धा गुंडाळल्या असून केवळ हौस म्हणून ते डान्स करतात.
First published:

Tags: Dancer, Viral video.

पुढील बातम्या