मुंबई २७ नोव्हेंबर : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ लोकांचे मनोरंजन करतात. त्यामुळे ते पाहाण्यात त्यांचा वेळ कसा निघून जातो, ते त्यांचं त्यांनाच कळत नाही. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ हे खूपच सुंदर आणि क्यूट असतात. मुलांचे असे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा जणू काही पळूनच जाते.
सध्या असाच एका लहान मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो लोकांना फारच आवडला आहे.
चॉकलेट, आइस्क्रीमपासून मुलांना दूर ठेवणे हे कोणत्याही पालकांसाठी सोपे काम नाही. विशेष म्हणजे गोड गोष्टी मुलांना फारच आवडतात. पण जेव्हा ही मुलं पहिल्यांना चॉकलेट किंवा आइस्क्रीम टेस्ट करतात, तेव्हा त्यांची रिएक्शन कशी असते हे तुम्ही कधी पाहिलंय का?
हे ही पाहा : पेट्रोल भरताना तरुणाकडून अशी चुक, Video पाहून तुम्हाला ही बसेल धक्का
हा व्हायरल क्यूट व्हिडीओ हा याच गोष्टीशी संबंधीत आहे. या व्हिडीओमधील चिमुकली पहिल्यांदा आइस्क्रीमची चव घेत आहे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे एक्स्प्रेशन येतात, ते खरोखरंच पाहाण्यासारखे असतात.
खरंतर एका आईने आपल्या मुलीची पहिल्यांदा आइस्क्रीम खाताना कशी रिएक्शन आहे, हे पाहाण्यासाठी हे दृश्य आपल्या फोनमध्ये कैद केलं आहे. जे तिने सोशल मीडियावर देखील शेअर केलं आहे
व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुरुवातीला या मुलीनं आईस्क्रीमला पहिल्यांदा चाखलं. तेव्हा ती थोडी कन्फ्यूज होती, मग ती पुन्हा काळजीपूर्वक आइस्क्रीम चाटते. तेव्हा तिला आइस्क्रीमची ही टेस्ट आवडते आणि खूप गोड अशी रिएक्शन देते.
View this post on Instagram
काही सेकंदाचा हा व्हिडीओ खूपच क्यूट आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर 'होम ऑफ बेबी' नावाच्या सोशल मीडिया हँडलसह शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओवर अनेक युझर्सनी कमेंट्सही केल्या आहेत.
एका युझरने लिहिले की, "ज्या प्रकारे बाळाला आइस्क्रीम टेस्ट करण्यासाठी वेळ लागला ते मला आवडले. आणखी एका युझरने लिहिले, "यम्मी! . आणखी एका युझरने लिहिले की, 'हॅपी डान्स. ' पण काही युजर्सने यावर टीका देखील केली आहे. लहान मुलांना असं आइस्क्रीम देणं चुकीचं असल्याचं देखील काही लोकांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: School children, Social media, Top trending, Videos viral, Viral