मराठी बातम्या /बातम्या /Viral /स्टेजवर डान्स करताना मुलगी विसरली स्टेप्स, पुढे वडिलांनी जे केलं, Video होऊ लागला ट्रेंड

स्टेजवर डान्स करताना मुलगी विसरली स्टेप्स, पुढे वडिलांनी जे केलं, Video होऊ लागला ट्रेंड

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

आपल्याला इंटरनेटवर बाप-लेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बाँडिंगचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच खूपच क्यूट असा हा व्हिडीओ आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 09 फेब्रुवारी : वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं. मुली वडिलांच्या खूप लाडक्या असतात. खरंच त्या ‘पापा की परी’ असतात, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण मुलगी वडिलांसाठी नक्कीच तेवढी खास असते.

    आपल्याला इंटरनेटवर बाप-लेकीच्या प्रेमाचं, त्यांच्या बाँडिंगचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेक क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओत मुलगी स्टेजवर डान्स करताना अचानक स्टेप्स विसरते, पण तितक्यात तिचे वडील तिची मदत करतात. या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

    हे ही पाहा : नोरा फतेहीच्या गाण्यावर चिमुकल्याचा असा डान्स, Video पाहून अभिनेत्रीला फुटेल घाम

    हा व्हायरल व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 24 सेकंदांच्या क्लिपमध्ये, एक वडील आपल्या मुलीला दलेर मेहंदीच्या टुनक टुनक या लोकप्रिय गाण्यावर डान्स करण्यात मदत करताना दिसत आहेत. जेव्हा ती स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा तिच्या वडिलांनी तिला मदत केली.

    मुलीला मदत हवी असेल, तिला गरज असेल आणि तिचे वडील तिथे पोहोचणार नाहीत, असं कसं शक्य आहे. हेच त्या व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे. तर, एक लहान मुलगी शाळेतील कार्यक्रमात स्टेजवर डान्स करत असते. तिच्याबरोबर इतर मुलीही असतात. पण ही अचानक तिच्या डान्स स्टेप्स विसरते आणि इकडे तिकडे पाहू लागते.

    अशातच ती ऑडियन्समध्ये बघते. तिथे समोरच तिचे वडील बसलेले असतात. ती त्यांच्याकडे बघते, नंतर तिचे वडील तिला डान्स स्टेप्स करून दाखवतात. इकडे ऑडियन्समध्ये बसलेले वडील ज्या स्टेप्स करतात, त्याच पाहून ती मुलगी स्टेजवर डान्स करू लागते. इतर मुलांबरोबर स्टेप्स मॅच करून ती डान्स करते.

    हे दृश्य पाहिल्यानंतर ऑडियन्समध्ये बसलेल्या काही पालकांनी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यात वडील ज्या स्टेप्स करतात, त्याच मुलगी करताना दिसते. तर, आजूबाजूला बसलेले ऑडियन्स व पालकही या बाप-लेकीचा चिअर्स करताना दिसतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    या व्हिडिओला सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

    First published:

    Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral