• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ओ शेठ तुम्ही नादच केलाय! कोंबड्याच्या पाठीवर बसून कुत्र्याच्या पिल्लाची ऐटीत सवारी; पाहा Video

ओ शेठ तुम्ही नादच केलाय! कोंबड्याच्या पाठीवर बसून कुत्र्याच्या पिल्लाची ऐटीत सवारी; पाहा Video

या व्हिडिओमध्ये एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू एका कोंबड्याच्या (Puppy And Rooster Video) पाठीवर बसून सवारी करत असल्याचं दिसतं. हे वाचून तुम्हालाही विश्वास बसला नसेल मात्र याचा व्हिडिओही समोर आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. हे व्हिडिओ नेटकऱ्यांचंही भरपूर मनोरंजन करतात. हे व्हिडिओ इतके रंजक असतात की ते पाहून कोणाचाही दिवस चांगला जातो. प्राण्यांचे व्हिडिओ (Animal Videos) तसंही अनेकांचं मन जिंकून घेतात. मात्र, सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो जास्तच खास आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू एका कोंबड्याच्या (Puppy And Rooster Video) पाठीवर बसून सवारी करत असल्याचं दिसतं. हे वाचून तुम्हालाही विश्वास बसला नसेल मात्र याचा व्हिडिओही समोर आला आहे. तरुणीच्या बेबी बम्पच्या आकाराची सोशल मीडियावर चर्चा; कारण ऐकून हैराण व्हाल! व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका पांढऱ्या रंगाच्या कोंबड्याच्या अंगावर छोटसं कुत्र्याचं पिल्लू बसलेलं आहे. हा छोटासा डॉगी कोंबड्याची मान पकडून बसला आहे. जेणेकरून तो खाली पडणार नाही. तर, दुसरीकडे डॉगीच्या वजनामुळे कोंबडा मात्र थोडा थकल्यासारखा दिसत आहे. मात्र, तरीही कोंबडा संपूर्ण जोर लावून पुढे चालत असल्याचं दिसतं. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by DELİ MAVİ (@_deli_mavi_)

  हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच अनेकांनी यावर मजेशीर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरनं लिहिलं, खरंच हा व्हिडिओ पाहून कोणीही अवाक होईल. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहिती आहे, की डॉगीचं वजन कोंबड्यापेक्षा अधिक असतं. मात्र, तरीही कोंबड्यानं हार न मानता डॉगीला या सवारीचा आनंद लुटू दिला आहे. VIDEO:असा धोका पत्करू नका! पुराच्या पाण्यात वाहून जात असतानाही दुचाकी सोडेना व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात डॉगी आणि कोंबडा यांच्यातील खास मैत्री दिसत आहे. हा कुत्रा कोंबड्याला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवत नाहीये. काही यूजर्स ही माणसांपेक्षाही चांगली आणि खरी मैत्री असल्याचं म्हणत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: