भर उन्हात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी टबमध्ये उतरलं हत्तीचं पिल्लू, पाहा CUTE VIDEO

भर उन्हात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी टबमध्ये उतरलं हत्तीचं पिल्लू, पाहा CUTE VIDEO

हत्तीचे (Elephant ) पिल्लू पाण्याच्या टबमध्ये पडून पाण्यात खेळताना दिसतं आहे. सोशल मीडियावर (Social Media) नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला भरपूर लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 13 एप्रिल : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) होत असतात आणि नेटकरी त्या व्हिडिओवर भरभरून लाईक्स, कमेंटचा वर्षाव करतात. हे व्हिडिओ भरपूर शेअरही होतात. नुकताच हत्तीच्या पिल्लाचा असाच एक क्यूट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हत्तीचे (Elephant)पिल्लू पाण्याच्या टबमध्ये पडून पाण्यात खेळताना दिसतं आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला भरपूर लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. या व्हिडिओला १६ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं असून हे पिल्लू खूप 'क्यूट' असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये कार्यरत सुशांत नंदा यांनी या पिल्लाचा ५१ सेकंदाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये हत्तीचे पिल्लू पाण्याने भरलेल्या टबमध्ये डुबकी मारून बराच वेळ पाण्यात खेळतं आहे. या व्हिडिओला २५० हून अधिक लोकांनी रिट्विट आणि 1950 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. व्हिडिओमध्ये हत्तीण टबभोवती फिरून पाण्यात खेळणाऱ्या पिल्लावर लक्ष देत असल्याचंही दिसतं आहे.

"पाहा,उन्हाळ्यात आईच्या देखरेखीखाली कोण पाण्याचा आनंद लुटतंय." असं कॅप्शन सुशांत नंदा यांनी दिलं आहे. ट्विटरवर अनेकांनी या व्हिडिओवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे. एका युजरने म्हटलंय की, 'फारच थोड्या लोकांना हे माहिती आहे, की हत्तीचे पिल्लू हे पृथ्वीवरील सर्वात खोडकर मूल आहे. तर एकानं लिहिलं की, 'उन्हाळ्यात छान मजा चालली आहे. एकजण म्हणतो, की हे पिल्लू अगदी छोट्या बाळाप्रमाणे खेळत आहे. काही जणांनी त्या पिल्लाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. एक युजर म्हणतो, की आपण त्यांना पाण्याच्या डबक्यापर्यंत मर्यादित करून ठेवलं आहे. तर एकाने लिहिलंय की, हे प्राणी इतके सुंदर आणि निरागस आहेत तरीही आपण त्यांच्यावर प्रेम करत नाही.

अरे बापरे! जंगल सफारी करताना चक्क गाडीतच घुसला सिंह आणि... Shocking Video Viral

प्राण्यांना विशेषत: हत्तींना पाण्याची खूप आवड असते. त्यामुळे हत्ती किंवा इतर प्राण्यांचे असे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. हा व्हिडिओ शेअर करणारे नंदा नेहमी प्राण्यांचे असेच क्यूट व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच सुशांत नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये सिंह एका बदकाच्या पाठीवर थोपटताना दिसत होता. जणू काही तो पाण्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या त्या बदकाला मदत करण्याचा प्रयत्न करीत होता, असंच हा व्हिडिओ पाहून वाटलं. सतत कोरोनाच्या बातम्या, त्याबद्दलची माहिती याचा कंटाळा आला असेल तर सोशल मीडियावर असे व्हिडिओ शोधा आणि त्यांचा आनंद लुटा.

Published by: Kiran Pharate
First published: April 13, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या