मराठी बातम्या /बातम्या /Viral /घट्ट मैत्री! झोपलेल्या कुत्र्याला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली अजब पद्धत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

घट्ट मैत्री! झोपलेल्या कुत्र्याला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली अजब पद्धत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मांजर वारंवार चाटत असल्याने झोपलेला हा कुत्रा उठतो. काही वेळानंतर हा कुत्राही मांजरीला चाटू लागतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मांजर वारंवार चाटत असल्याने झोपलेला हा कुत्रा उठतो. काही वेळानंतर हा कुत्राही मांजरीला चाटू लागतो

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मांजर वारंवार चाटत असल्याने झोपलेला हा कुत्रा उठतो. काही वेळानंतर हा कुत्राही मांजरीला चाटू लागतो

नवी दिल्ली 01 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत मांजर आणि कुत्र्याचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Cat and Dog) होत राहतात. यातील काही व्हिडिओमध्ये दोघांमधील भांडणं पाहायला मिळतात. तर, काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, जे पाहून हसू आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर कुत्रा आणि मांजरीचा असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एकमेकांचे कट्टर दुश्मन असलेले हे प्राणी या व्हिडिओमध्ये मात्र वेगळ्याच अंदाजात दिसले. व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड प्रजातीचा कुत्रा अगदी मजेत सोफ्यावर झोपलेला दिसतो. यादरम्यान मांजर तिथे येऊन जे काही करते ते अतिशय मजेशीर आहे.

काय ते प्रेम! दिवाळीपूर्वी एकमेकांचा नट्टापट्टा करताना दिसली माकडं, मजेशीर VIDEO

पाहायला गेलं तर कुत्रा आणि मांजर एकमेकांचे कट्ट दुश्मन आहेत. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये याउलट चित्र पाहायला मिळतं. व्हिडिओमध्ये एक कुत्रा सोफ्यावर झोपला असल्याचं दिसतं. तर एक मांजर त्याच्या शेजारीच बसलेली दिसते. ही मांजर कुत्र्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करते. यादरम्यान ती कुत्र्याला चाटू लागते. यामुळे कुत्रा जागा होतो. आता तुम्ही विचार केला असेल की झोपेतून उठताच कुत्रा मांजराच्या मागे पळाला असेल. मात्र, असं काहीच होत नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मांजर वारंवार चाटत असल्याने झोपलेला हा कुत्रा उठतो. काही वेळानंतर हा कुत्राही मांजरीला चाटू लागतो. हे दृश्य सर्वांनाच थक्क करणारं आहे. कारण कुत्रा आणि मांजरीची इतकी घट्ट मैत्री क्वचितच पाहायला मिळते.

VIDEO : तरुणींनीलग्नात नवरदेवला दिलं विचित्र गिफ्ट; उघडताच मंडपात पिकला हशा

21 सेकंदाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल डिस्कशन फोरम रेडिटवर ChanceTomorrowDance नावाच्या ग्रुपने शेअर केला आहे. एक दिवसाआधी शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरत आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, जर्मन शेफर्ड मांजराच्या पिल्लासोबत किती चांगल्या पद्धतीनं वागत आहे. हा व्हिडिओ खरंच फार सुंदर आहे.

First published:

Tags: Cat, Dog, Funny video