मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video : पाण्यावर अचानक धावू लागला कुत्रा, पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

Viral Video : पाण्यावर अचानक धावू लागला कुत्रा, पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका कुत्र्याचा आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा असं काहीतरी काम करतो की पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 30 जानेवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगणं तसं कठीण आहे. पण काही मजेदार आणि आश्चर्यचकीत करणाने व्हिडीओ मात्र नेहमीच लोकांच्या पसंतीस उतरतात. हे असे हलके फुलके व्हिडीओ आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात आणि दिवसभराचा ताण विसरायला भाग पाडतात.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ एका कुत्र्याचा आहे. या व्हिडीओमध्ये कुत्रा असं काहीतरी काम करतो की पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.

हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर

हो, कारण जे कोणालाही शक्य नाही, असं या कुत्र्याने करुन दाखवलं आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच या कुत्र्यामध्ये एक सुपरनॅचरल पावर असल्याचं वाटत आहे.

हे तर सगळ्यांनाच माहित आहे की पाण्यावर कोणीही चालू शकत नाही. जो कोणी पाण्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो तो पाण्यात बुडतो. मग अशावेळी तो प्राणी असु देत किंवा मग माणूस सगळ्यांसाठी पाण्याचा नियम सारखाच आहे. पण असं असलं तरी या व्हिडीओमधील कुत्र्यानं या पाण्याच्या सिद्धांताला खोटं पाडलं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान कुत्रा स्विमिंगपुलच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर पोहोचण्यासाठी पाण्यावरुन जातो. सुरुवातीला व्हिडीओ पाहाताना असं दिसत आहे की हा कुत्रा आता पाण्यात पडेल, पण असं न होता. हा कुत्रा पाण्यावरुन पळत एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जातो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाउंट आणि प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हे कसं घडलं असाच प्रश्न पडला आहे. या कुत्र्यामध्ये काहीतरी वेगळीच शक्ती असल्याचं देखील अनेकांचं म्हणणं आहे. पण नक्की हे कसं आणि कुठे घडलं हे सांगता येणं कठीण आहे.

First published:

Tags: Dog, Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral