अयोध्या, 19 ऑगस्ट : नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांची साखळी असतानाही अनेकदा लोक कायदा स्वत:च्या हातात घेतात आणि मारहाण करीत गुन्हेगाराला हवी ती शिक्षा देतात. अनेकदा अशा प्रकारचा विनाकारण एखाद्याचा जीव जाण्याची भीती असते. असाच एक धक्कादायक प्रकार अयोध्येत घडला आहे. येथील काही लोकांनी चोराला झाडाला बांधून त्याला मारहाण केली. या चोराला (Thief) तब्बल 9 तास झाडाला बांधून ठेवलं होतं. तो विव्हळत होता, रडत होता, मात्र तरीही त्याला जबर मारहाण केली जात होती. (cruelty Thief tied to a tree and beaten with a stick for 9 hours Video Viral )
दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. यानंतर पोलिसांनी चोरासह त्याला मारहाण करणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा दो चोर रिक्षेने भदरसा येथील इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. यादरम्यान गोंधळ वाढला. यातून एक चोर तर पळून गेला आणि मात्र दुसऱ्याला तेथील नागरिकांनी पकडलं. नागरिकांनी चोराला झाडाला बांधलं व त्याला खूप मारहाण केली. यादरम्यान चोर आपल्या चुकांची माफी मागित होता. मात्र मारणाऱ्यांनी त्याचं अजिबात ऐकलं नाही. आणि त्याला काठीने मारतच राहिले.
हे ही वाचा-Video : छोट्याशा फळीवरुन सायकल चालवत होता तरुण; तोल जाताच पाण्यात पडला उताणा
त्यानंतर पोलिसांना याबद्दल सूचना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी हजर झाले. त्यांनी चोर आणि त्याला मारणारे अशा सर्वांना पोलीस ठाण्यात नेलं. धीरेंद्र प्रताप सिंह असं या चोराचं नाव असून त्याच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. चोर आणि त्याला मारहाण करणारे अशा दोघांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. जेव्हा त्याला झाडाला बांधून मारहाण केली जात होती, त्यावेळेस स्थानिकांनी व्हिडीओ शूट करीत सोशल मीडियावर व्हायरल केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking viral video