सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक कावळा आपल्या घरट्यासाठी हरणाच्या शेपटीचे केस काढताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर 'नेचर' नावाच्या पेजवरुन कॅप्शनसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, 'मला घरटं बनवण्यासाठी हे केस हवे आहेत. धन्यवाद साहेब.' व्हिडिओमध्ये एक हरिण एका बेंचजवळ आणि काही झाडांजवळ बसलेलं दिसत आहे. हरिण जंगलाकडे बघत आहे आणि अचानक एक कावळा त्याच्या मागे येतो. कावळा हरणाची शेपटी उचलतो आणि त्याच्या चोचीने शेपटीचे केस काढतो. मात्र तरीही हरिण आपल्या जागेवरुन हालत नाही किंवा मागेही वळून पाहात नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बिबट्याजवळ गेला तरुण; रेस्क्यूसाठी झाडावर चढला आणि... अंगावर काटा आणणारा VIDEO कावळा हे एकदा नाही तर अनेक वेळा करतो. कावळा या केसांचा वापर काड्या आणि इतर साहित्यासोबत घरटं विनण्यासाठी करणार आहे.. हा व्हिडिओ 1 लाख 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि व्हिडिओ सुमारे 16 हजार लाइक्स मिळाले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.