मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - पुराच्या पाण्यात नवं संकट आलं वाहत; घराबाहेर भयानक दृश्य पाहून नागरिकांचा उडाला थरकाप

VIDEO - पुराच्या पाण्यात नवं संकट आलं वाहत; घराबाहेर भयानक दृश्य पाहून नागरिकांचा उडाला थरकाप

पुराच्या पाण्यासोबत नागरी वस्तीत घुसली मगर.

पुराच्या पाण्यासोबत नागरी वस्तीत घुसली मगर.

पुराच्या पाण्यासोबत मगरही नागरी वस्तीत शिरल्याने एकच खळबळ उडाली.

  • Published by:  Priya Lad
भोपाळ, 16 ऑगस्ट : मुसळधार पावसाने बहुतेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पूर आले आहेत. पुराचं पाणी घराघरात घुसलं आहे. हे संकट कमी की काय त्यात पुराच्या पाण्यासोबत आणखी एक नवीन संकट आलं आहे. पुराच्या पाण्यात असं काही वाहत आलं की पाहून नागरिकांचा थरकाप उडाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. कारण हे संकट म्हणजे चक्क एक खतरनाक मगर आहे. मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मगर कशी शिकार करते हे तुम्हाला माहितीच आहे. अगदी पाण्यात लपून समोरच्याला बेसावध ठेवत ती संधी साधून हल्ला करते. एकदा का कुणी तिच्या जबड्यात गेलं की त्याची सुटका नाहीच. अशी मगर पुराच्या पाण्यातून नागरी वस्तीत शिरून गल्लोगल्ली फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. हे वाचा - हिरोगिरी करत स्वतःच मगरीच्या जबड्यात दिला हात, नको तो खेळ आला अंगाशी; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता एका गल्लीत पुराचं पाणी दिसतं आहे. दोन्ही बाजूंनी घरं आहे या घऱातही पाणी घुसलं आहे. घराच्या छतांवर लोक उभे आहेत. जे खाली वाकून पाहत आहेत. गल्लीतील या पाण्यातून मगर पोहोताना दिसत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधील शिवपुरीच्या रहिवाशी कॉलनीतील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातं आहे. इथं रहिवासी परिसरात पुराच्या पाण्यात मगर दिसणं असामान्य आहे. @Pankajtumhara ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - शत्रूचा खात्मा करायला जाताना जवानाच्या मार्गात अचानक आला खतरनाक किंग कोब्रा; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO त्यानंतर तात्काळ वनविभागाला याची माहिती देण्यात आली. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर मगरीला पकडण्यात आलं आणि शहरातून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे सुदैवाने मगरीमुळे कुणाला हानी पोहोचलेली नाही.
First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या