कॅनबरा, 27 नोव्हेंबर : मगर आणि शार्क तसे दोन्ही पाण्यातले विशाल जलचर प्राणी. शार्क असो किंवा मगर दोन्ही पाहून कोणाच्याही काळजात धडकी भरतेच. दोघंही ताकदवर आणि शिकारीत तरबेज पण हे दोन्ही जलचर प्राणी एकमेकांसमोर येतात तेव्हा नेमकं काय घडत असेल हा विचार केला आहे का?
जेव्हा दोघं एकमेकांसमोर येतात तेव्हा लढाई अटळ असं वाटतं. ऑस्ट्रेलियामधील कुनुनुरा परिसरातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. मासेमारीसाठी गेलेल्या दोन व्यक्तींना पाण्यामध्ये मोठी हालचाल जाणवली. नेमकं काय घडतंय हे पाण्यासाठी त्यांनी ड्रोन कॅमेरा सोडला आणि या कॅमेऱ्यानं ही दृश्यं टिपली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हे वाचा-अशी सासू हवी? लग्नाच्या दिवशी जावयाला दिलं अस्सं गिफ्ट की.. पाहा VIDEO
आक्रमक असलेला शार्क मासा आणि 16 फुटांची मगर दोघंही एकमेकांसमोर आले आहेत. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार दोन मासेमारी करणाऱ्या व्यक्तींनी ड्रोनच्या सहाय्यानं हे दृश्यं टिपलं आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक क्षण असं वाटतं की आता दोन्ही विशाल आणि शक्तीशाली प्राणी एकमेकांना भिडतील पण 16 फूट लांब मगरीला पाहून शार्क मासा अवघ्या काही अंतरावरून आपली वाट बदलतो आणि पुढे चालू लागतो. दोघांमध्ये लढाई चक्क होत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ युट्यूबवर 11 नोव्हेंबररोजी पोस्ट करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1 लाख 70 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.