जिवासाठी धडपडही करता आली नाही; काही कळायच्या आतच मगरीचं भक्ष्य झालं बदक; पाहा VIDEO

जिवासाठी धडपडही करता आली नाही; काही कळायच्या आतच मगरीचं भक्ष्य झालं बदक; पाहा VIDEO

पाण्यात शांतपणे असलेलं हे बदल (duck) दुसऱ्याच क्षणी मगरीच्या (crocodile) जबड्यात होतं.

  • Share this:

मुंबई, 03 डिसेंबर : तो मुक्तपणे पाण्यात तरंगत होता, त्यानं कल्पनाही केली नसेल की काही क्षणात आपला जीव जाणार आहे. आता तो पाण्यात होता आणि दुसऱ्याच क्षणी मगरीच्या (Alligator) तोंडात गेला. काही कळाच्या आतच पाण्यात पोहोणारं बदल (duck) मगरीचं भक्ष्य झालं आहे. त्याला आपला जीव वाचवण्यासाठी धडपडही करता आली नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर प्राण्यांप्रमाणे मगर कधीच आक्रमकपणे शिकार करताना दिसत नाही. हळूच जात ती आपला शिकार गाठते. काही प्राण्यांना याची चाहूल लागताच ते आपल्या जीव वाचवण्यासाठी धडपडतात, त्यावेळी मगर आक्रमक होत त्या प्राण्याला गिळण्याचा प्रयत्न करते. मात्र सध्या अशा एका मगरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिनं इतक्या सावधपणे शिकार केली आहे, ही अगदी शांतपणे आपलं भक्ष्य तोंडात घेत काही क्षणातच गिळून टाकते.

व्हिडीओत पाहू शकता एक भुकेली मगर आपल्या भक्ष्याच्या शोधात पाण्यात फिरते. समोर काही बदक पाण्यात दिसत आहेत. हळूच ही मगर एका बदकाच्या मागे येते आणि त्या बदकाला कळायच्या आतच ती त्याला तोंडात घेते. मगरीनं शिकार इतक्या सावधपणे केली आहे, की त्या बदकाला आपलं भक्ष्य बनवल्यानंतर आजूबाजूच्या इतर बदकांनाही त्याची चाहूल लागत नाही.

हे वाचा - भुकेलेल्या मगरीनं केली कासवाची शिकार; तोंडात घेताच झाली अशी अवस्था, पाहा VIDEO

हा व्हिडीओ फ्लोरिडातील एका नदीतील असल्याचा सांगितलं जातो आहे. कास कोवे या फेसबुक युझरनं आपल्या फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. कास कोवे आणि केविन स्टाइप हे दोघं बदकाची शिकार करण्यासाठी नदीवर गेले होते. त्यावेळी त्यांना नदीत जवळपास  13 फूट लांब मगर दिसली आणि तिथं असं दृश्यं त्यांना दिसलं.

Published by: Priya Lad
First published: December 3, 2020, 11:27 PM IST

ताज्या बातम्या