Home /News /viral /

थरारक VIDEO: मगरीनं कुत्र्याचा अलगद घेतला घास! नदी काठावरून फिरताना काळजी घ्या

थरारक VIDEO: मगरीनं कुत्र्याचा अलगद घेतला घास! नदी काठावरून फिरताना काळजी घ्या

नदीकाठावर काही खायला मिळतंय का हे पाहत असताना एका कुत्र्यावर मगरीनं (Crocodile Hunted Dog) जोरदार हल्ला चढवला आणि त्याची शिकार केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.

    जयपूर, 26 मे : सध्या अनेक नद्यांमध्ये मगरींचा वावर चांगलाच वाढलाय. नेहमी भक्ष्याच्या शोधात असलेल्या या मगरींपासून आपण काळजी घेणं गरजेचे आहे. नदीकाठावर काही खायला मिळतंय का हे पाहत असताना एका कुत्र्यावर मगरीनं (Crocodile Hunted Dog) जोरदार हल्ला चढवला आणि त्याची शिकार केली. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील चंबळ नदीच्या (Chambal River) काठावरील आहे. मगरीनं अगदी शांतपणे येऊन कुत्र्यावर हल्ला केला. क्षणार्धात कुत्र्याला काही समजायच्या आतच त्याची शिकार झाली होती. यावरून लहान मुलांसह सर्वांनीच नदीकाठी फिरताना काळजी घेणं किती गरजेचं आहे, हे दिसून येतं. हा व्हिडिओ गेल्या मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान येथील रावतभाटा येथे शूट केला असल्याचं सांगण्यात येत आहे. रावतभाटा येथील राणा प्रताप सागर धरणाजवळ एक कुत्रा नदी काठावर काही खायला मिळतंय का, हे शोधत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याच्या पाठीमागे नकळतपणे हळूहळू मगर येत होती. नदीकाठावरील काही लोकांनी मगर येताना पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. आता ही मगर कुत्र्याला पकडणार की, काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. हे वाचा - महिलेने दारू पिऊन क्लबच्या बाहेर केलं धक्कादायक कृत्य; Viral Video पाहून संताप येईल! लांबून मगरीनं या कुत्र्यावर लक्ष ठेवून त्याला अजिबात न समजून देता जवळ-जवळ येण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचं मात्र आपल्या पाठीमागं आलेल्या भल्यामोठ्या संकटाकडं जराही लक्ष नव्हतं. कुत्र्याच्या अगदी जवळ आल्यानंतर मगरीनं क्षणार्धात जबडा उघडून कुत्र्याला पकडलं. तिचा हल्ला एवढा जबरदस्त होता की, कुत्र्याला जराही प्रतिकार करता आला नाही. हे वाचा - लज्जास्पद! मृत मुलाला जिवंत करण्यासाठी दबाव; विद्यार्थिनींना चेटकीण म्हणत गावात अर्धनग्न करून बेदम मारहाण कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून ही मगर त्याला घेऊन गेली. नदीकाठावरून फिरताना काळजी घेणं किती गरजेचं आहे, हे या व्हायरल व्हिडिओवरून समजतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crocodile, Dog, Shocking viral video, Video viral

    पुढील बातम्या