— Nature Is Metal (@Naturelsmetall) April 8, 2022सध्या समोर आलेला व्हिडिओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक केअर टेकर मगरीला खाद्य देण्यासाठी पुढे जाते. मगरीला खाद्य देण्यासाठी ती आपला हात पुढे करते. मात्र मगर अचानक केअर टेकरवर हल्ला करते आणि तिचा हात आपल्या जबड्यात पकडते. यानंतर मगर या तरुणीला पाण्यात खेचते. मगर तिला पाण्यात घेऊन जात तिथेही तिच्यावर हल्ला करते. ही तरुणी स्वतःला मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी भरपूर प्रयत्न करते. मुंबईत ऑफिसमध्ये घुसला विषारी साप, पुढे जे घडलं ते झालं कॅमेऱ्यात कैद, Watch Video इतक्यात तिथे उपस्थित असलेले इतर कर्मचारीही धावत या तरुणीच्या मदतीसाठी पुढे येतात. हे लोक मगरीला पकडून तिचा जबडा खोलतात. अखेर ही तरुणी आपला जखमी झालेला हात मगरीच्या जबड्यातून बाहेर काढते आणि स्वतःची सुटका करून घेते. हा व्हिडिओ अतिशय भीतीदायक आणि अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी या तरुणीच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Shocking video viral