Home /News /viral /

घाबरवण्याचा प्रयत्न करत होती व्यक्ती, मगरीने अक्षरश: चेंदामेंदा करून टाकला; अंगावर काटा आणणारा VIDEO

घाबरवण्याचा प्रयत्न करत होती व्यक्ती, मगरीने अक्षरश: चेंदामेंदा करून टाकला; अंगावर काटा आणणारा VIDEO

एका व्यक्तीने मगरीशी पंगा घेतला पण मगरीने तिला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे.

    मुंबई, 05 ऑगस्ट : जंगलात जसं सिंहाचं राज्य तसं पाण्यात मगरीचं. पाण्यात राहून मगरीशी वैर घेऊ नये असं म्हणतात. सिंह, वाघ, बिबट्या असे खतरनाक प्राणीही मगरीला घाबरतात. मगरीशी पंगा घेण्याची हिंमत करत नाही. पण एका व्यक्तीने ती केली. मगरीला घाबरण्याचा या व्यक्तीने प्रयत्न केला. संतप्त मगरीने अक्षरशः चेंदामेंदा करून टाकला. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येईल. एक व्यक्ती चक्क मगरीच्या जवळ गेली आणि मगरीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीला वाटलं मगर आपल्याला घाबरेल पण मगर चवताळली. त्यानंतर तिने असं काही केलं की व्यक्तीला आयुष्यभराची अद्दल घडली. यापुढे मगरीच्या जवळ जाण्याचीही कधीच हिंमत करणार नाही. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती कारमध्ये बसली आहे. कारसमोर एक मगर येते. त्यानंतर ही व्यक्ती कारने त्या मगरीला घाबरवण्याचा प्रयत्न करते. कार हळूहळू मगरीच्या दिशेने सरकवते. आपण तुला चिरडून टाकू असं ती मगरीला दाखवते. हे वाचा - भलतीच डेअरिंग करत थेट खतरनाक मगरीलाच मारली मिठी आणि...; तरुणाचं काय झालं तुम्हीच पाहा VIDEO पण मगर ती मगरच. कसली घाबरते आणि कसली मागे हटते. तीसुद्धा आपल्या जागेवर तशीच राहिली. गाडीचं चाक पुढे येत असतानाही ती घाबरली नाही, मागे हटली नाही. किंचितशीही हलली नाही. उलट जबडा उघडून राहिली. तरी व्यक्ती मगरीला घाबरण्याचा प्रयत्न करत राहिली. शेवटी मगर इतकी चवताळली की तिने कारवर हल्ला केला. कारचा पुढील भाग तिने आपल्या दाताने उघडून काढला. कारचा अक्षरशः चेंदामेंदाच केल्याचं दिसतं. हे वाचा - खाणं द्यायला म्हणून गाडीची खिडकी उघडली, भुकेल्या वाघाने झडप घातली अन्...; थरारक VIDEO Vicious Videos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या