मराठी बातम्या /बातम्या /Viral /

समोर मगर दिसताच बिबट्यानं घेतली उडी अन्...; पाहा अंगावर काटा आणणारा Live Video

समोर मगर दिसताच बिबट्यानं घेतली उडी अन्...; पाहा अंगावर काटा आणणारा Live Video

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की बिबट्या आरामात पाणी पित आहे. इतक्यात अचानक एक मगर पाण्यातून बाहेर येते आणि बिबट्यावर हल्ला करते (Crocodile Attacks a Leopard) .

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 18 जुलै : शिकारी प्राणी नेहमीच आपल्या शिकारीच्या शोधात असतात. संधी मिळताच ते समोरच्या प्राण्याचा फडशा पाडतात. हे प्राणी शिकारीसाठी वेग आणि हुशारी या दोन्हीचा वापर करतात. विशेषतः सिंह (Lion) आणि वाघ (Tiger) यासारख्या प्राण्यांचा शिकारीचा अंदाज तर पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ (Viral Video of Wild Animals) शेअर केले जातात, ज्यात प्राणी शिकार करताता दिसतात. अशाच एका व्हिडिओमध्ये एका बिबट्याच्या चेहऱ्यावर भीती पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Video :...आणि रेल्वे ट्रॅकवर धावू लागली कार; हा प्रताप पाहून प्रवासीही हैराण

ज्याप्रकारे जंगलात सिंह आणि चित्ता यांची दहशत असते तशीच पाण्यात मगरीची असते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मगरीच्या हल्ल्यातून वाचणं सोपी गोष्ट नाही. या गोष्टीचा अंदाज तुम्हाला सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहूनच येईल. यात बिबट्या मगरीला पाहताच धूम ठोकतो. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की बिबट्या आरामात पाणी पित आहे. इतक्यात अचानक एक मगर पाण्यातून बाहेर येते आणि बिबट्यावर हल्ला करते (Crocodile Attacks a Leopard) . मात्र, आधीच सावध असलेला बिबट्या समोर मगर दिसताच एक मोठी उडी घेतो आणि मगरीपासून स्वतःचा बचाव करतो.

तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य?

जंगलातील शिकारीचा हा व्हिडिओ ट्विटरवर Life and nature नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. आतापर्यंत 4.4 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका यूजरनं म्हटलं, की हे दृश्य हैराण करणारं आहे. लोक ही व्हिडिओ क्लिक केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीयेत तर यावर विविध प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ पाहताना काही वेळासाठी तुमचंही मन सुन्न झालं असेल.

First published:

Tags: Crocodile, Leopard, Shocking video viral