मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाणी पिता पिता बदकाचा दुर्दैवी अंत; मृत्यूच्या जबड्यात जातानाचा थरारक VIDEO

पाणी पिता पिता बदकाचा दुर्दैवी अंत; मृत्यूच्या जबड्यात जातानाचा थरारक VIDEO

आपल्या मागून मृत्यू येत आहे, याची कल्पनाही त्या बदकाला नव्हती. जीव वाचवण्यासाठी त्याला धडपडताही आलं नाही.

आपल्या मागून मृत्यू येत आहे, याची कल्पनाही त्या बदकाला नव्हती. जीव वाचवण्यासाठी त्याला धडपडताही आलं नाही.

आपल्या मागून मृत्यू येत आहे, याची कल्पनाही त्या बदकाला नव्हती. जीव वाचवण्यासाठी त्याला धडपडताही आलं नाही.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 नोव्हेंबर : पाण्यात मगरीचं (Crocodile video) राज्य असतं. त्यामुळे जंगलात भले भले प्राणीही जेव्हा पाणी प्यायला नदी, तलावाजवळ जातात तेव्हा तेसुद्धा सावध असतात (Crocodile attack video). पण तरी अनेकदा मगर आपला डाव बरोबर साधते. अगदी पाण्यात प्राण्यांच्या अगदी तोंडाजवळ असतानाही मगर त्यांना दिसत नाही. बरोबर संधी साधून ती शिकार करते. मगरीच्या शिकारीचे असे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील (Crocodile attack on duck and chicken video). आता आणखी एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

एका मगरीने पाण्यात दोन पक्ष्यांना लक्ष्य केलं. एक पक्षी तिच्या तावडीत सापडला. मगरीने इतक्या वेगाने त्याची शिकार केली की त्याला आपला जीव वाचवण्यासाठी धडपडताही आलं नाही. तर सुदैवाने दुसरा पक्ष्याचा जीव मात्र वाचला आहे. हा खतरनाक व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

व्हिडीओत पाहू शकता नदीच्या किनाऱ्यावर बदक आणि कोंबडी आहे. बदक पाण्याच्या आत आहे तर कोंबडी पाण्याच्या बाहेर. पाण्याच्या दिशेला पाठ करत बदक पाणी पिताना दिसतं आहे.

हे वाचा - भयंकर! तरुणाने मगरीच्या जबड्यात घातलं आपलं डोकं आणि...; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

बदकाच्या मागून पाण्यातून हळूच एक मगर येते. आपल्या दिशेने जीवघेणं संकट येत आहे, याची कल्पनाच त्या बदकाला नव्हती. ते निवांतपणे पाणी पित होतं. मगर बदकावर अचानक हल्ला चढवते आणि एकाच फटक्यात ती त्याला आपल्या जबड्यात धरते. मगरीने इतक्या वेगाने हल्ला केला की बदक जसंच्या तसं तिच्या जबड्यात गेलं. म्हणजे एका क्षणी असलेलं बदक दुसऱ्या क्षणी नाहीसंच झालं.

हे वाचा - जबड्यातील कुत्र्याला सोडून मगरीने ठोकली धूम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

बदकाचा बळी गेला पण सुदैवाने कोंबडी वाचली. मगरीने बदकावर हल्ला करताच कोंबडी किंचितसी दूर झाली. पण तरी ती तिथून घाबरून हटली असंही नाही. ती तिथेच थांबली आहे. जणू जसं काही झालंच नाही.  beautifulldixe इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलआ हे.

First published:

Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal