मराठी बातम्या /बातम्या /Viral /

प्लॅस्टिक मॉडेल समजून खऱ्या मगरीसोबत काढू लागला सेल्फी; मगरीने हात जबड्यात धरून तलावात खेचलं अन्...

प्लॅस्टिक मॉडेल समजून खऱ्या मगरीसोबत काढू लागला सेल्फी; मगरीने हात जबड्यात धरून तलावात खेचलं अन्...

एका व्यक्तीसोबत थीम पार्कमध्ये असं काही घडलं की त्याच्या थेट जीवावरच बेतलं. या व्यक्तीला खरोखरची मगर प्लॅस्टिकचं मॉडेल (Plastic Model of Crocodile) असल्याचं वाटलं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 नोव्हेंबर : लहान मुलं असो किंवा मोठी माणसं थीम पार्कमध्ये जायला प्रत्येकालाच आवडतं. तिथे मनोरंजनाची इतकी साधनं असतात की दिवसभर इथे थांबलं तरीही मन लागतं. अनेक थीम पार्क्समध्ये प्राण्यांचे प्लास्टिकचे पुतळेही लावलेले असतात. यांच्यासोबत मुलं मस्तीही करतात आणि फोटोही काढतात. मात्र एका व्यक्तीसोबत थीम पार्कमध्ये असं काही घडलं की त्याच्या थेट जीवावरच बेतलं. या व्यक्तीला खरोखरची मगर प्लॅस्टिकचं मॉडेल (Plastic Model of Crocodile) असल्याचं वाटलं.

एवढंच वाचून तुम्हाला कल्पना आली असेल की पुढे नेमकं काय घडलं. फिलिपिंसच्या अमाया व्ह्यू अम्यूजमेंट पार्कमध्ये (Philippines Amusement Park) 68 वर्षाचा नेहेमिआस चीपद (Nehemias Chipada) आपल्या वाढदिवसानिमित्त फिरण्यासाठी गेला होता. तिथे त्याला एका छोट्या तलावात एक मगर दिसली. काही प्राण्यांप्रमाणेच हादेखील मगरीचा पुतळा असल्याचं त्याला वाटलं. नेहेमिआसने या मगरीसोबत सेल्फी घेण्याचा निर्णय घेतला.

मगरीजवळ जाऊन काही वेळ त्याने फोटो काढले मात्र अचानक मगरीने त्याचा हात आपल्या जबड्यात पकडला (Crocodile Attack) आणि त्याला पाण्यात खेचलं. हे पाहून या व्यक्तीचे कुटुंबीय घाबरले आणि जोरजोरात ओरडू लागले. या व्यक्तीने भरपूर प्रयत्न करून स्वतःला मगरीच्या तावडीतून सोडवलं आणि तो जमिनीवर येऊन पडला. त्याच्या हाताची मगरीने वाईट अवस्था केली होती. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या व्यक्तीची मुलगी मर्सीने पार्कवर केस करण्याचा निर्णय घेतला. तिचा असा आरोप आहे की पार्कने कुठेही असा इशारा दिलेला नाही की तलावात खरी मगर आहे. अशात कोणालाही नुकसान पोहोचू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीच्या हाताचं हाड तुटलं आहे आणि टाकेही पडले आहेत. हाताच्या एका भागातील मांसही निघालं होतं, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

First published:

Tags: Crocodile, Shocking news