मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! ती एक चूक जीवावर बेतली; 40 मगरींनी व्यक्तीचे तुकडे करून हातही गिळला

Shocking! ती एक चूक जीवावर बेतली; 40 मगरींनी व्यक्तीचे तुकडे करून हातही गिळला

40 मगरींचा व्यक्तीवर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)

40 मगरींचा व्यक्तीवर हल्ला (प्रतिकात्मक फोटो)

एक 72 वर्षीय व्यक्ती अचानक मगरींनी भरलेल्या पिंजऱ्यात पडला. हा वृद्ध आपल्या काठीच्या सहाय्याने मगरीला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली.

नवी दिल्ली 27 मे : माणसाची पाळीव प्राण्यांसोबत असलेली घट्ट मैत्री अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. पण पाळीव प्राण्यांसोबतच अनेकदा माणसं भयंकर प्राण्यांच्याही जवळ जाण्याचा आणि त्यांना न घाबरण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकवेळा ते अशी चूक करतात, जी घातक ठरते. वयाच्या शेवटच्या टप्प्यावर एका व्यक्तीने अशी चूक केली, जी त्याच्या मृत्यूचं कारण बनली. त्याने भयंकर मगरींजवळ जाण्याचा आणि त्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी जे केलं ते भयंकर होतं.

घटना कंबोडियातील आहे. इथे एक 72 वर्षीय व्यक्ती अचानक मगरींनी भरलेल्या पिंजऱ्यात पडला. हा वृद्ध आपल्या काठीच्या सहाय्याने मगरीला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. तिथे मगरींनी अंडी घातली होती. त्यांना वाटलं की ती व्यक्ती त्यांच्या अंड्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे. मग काय... मगरींनी ती काठी पकडून व्यक्तीला आतमध्ये ओढलं.

बिबट्याने घेतली व्यक्तीवर झेप; पण चक्क वाघाने जीव वाचवला, VIDEO पाहून व्हाल अवाक

काही वेळातच सर्व मगरी जमल्या आणि त्यांनी या व्यक्तीचे अक्षरशः तुकडे केले. त्याचं संपूर्ण शरीर ओरबडलं. कंबोडिया पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा तो माणूस अंडी देणाऱ्या पिंजऱ्यातील मगरीला काठीने छेडत होता, तेव्हाच त्यांनी हल्ला केला. जर या व्यक्तीने त्यांना छेडलं नसतं तर कदाचित त्यांनी हल्ला केला नसता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह बाहेर काढला.

पोलिसांनी सांगितलं की, व्यक्तीच्या शरीरावर हल्ल्याच्या इतक्या खुणा होत्या की त्या मोजता येत नव्हत्या. त्याचा एक हात मगरींनी गिळला होता. ही काही पहिली घटना नाही, याआधी 2019 मध्ये मगरींनी 2 वर्षांच्या मुलीचा बळी घेतला होता. मुलगी मगरींच्या फार्ममध्ये गेली होती. तेव्हाच ही घटना घडली होती.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Shocking news