मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'...अय्यर भाई SEXY', स्वत: श्रेयसनंचं शेअर केला मजेदार VIDEO

'...अय्यर भाई SEXY', स्वत: श्रेयसनंचं शेअर केला मजेदार VIDEO

टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं एक मजेदार व्हिडीओ (Video) इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 मे: कोरोना व्हायरसचा फटका क्रिकेटला बसला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यानं आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अचानक स्थगित करावी लागली. त्यामुळे सर्व भारतीय क्रिकेटपटू सध्या घरामध्येच आहेत. टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) तर मागील काही महिन्यांपासून खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. या दुखापतीमुळे त्याला आयपीएलमध्येही खेळता आलं नव्हतं. श्रेयस अय्यर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या संपर्कात आहे. त्यानं नुकताच एक मजेदार व्हिडीओ (Video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऑस्ट्रेलियात मागच्या वर्षी झालेल्या मॅचमधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक एकदम हटके घोषणा देत श्रेयसचा उत्साह वाढवत आहेत. ...अय्यर भाई सेक्सी श्रेयस अय्यर बाऊंड्रीवर फिल्डिंग करत असताना प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेला एक ग्रुप '1 रूपयाची पेप्सी, अय्यर भाई सेक्सी' अशी घोषणा करत होता. अय्यरनं हा व्हिडीओ शेअर केलाय. "मी माझी घोषणा निवडली आहे. आता मी पुनरागमन करण्याची फार वाट पाहू शकत नाही." असं त्यानं सांगितलं.
View this post on Instagram

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

श्रेयस अय्यरला भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सीरिजच्या दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या खांद्याचं ऑपरेशन झालं. 8 एप्रिलला श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, यानंतर पुढचे तीन महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही. याच कारणामुळे तो श्रीलंका दौऱ्यावरही जाऊ शकणार नाही. वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरने चमकदार कामगिरी केली आहे. 22 मॅचमध्ये 42 च्या सरासरीने त्याने 813 रन केले आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याला 29 सामने खेळून 550 रन करता आले.
First published:

Tags: Funny video, India vs Australia, Shreyas iyer, Video viral

पुढील बातम्या