मुंबई, 4 जून : केरळमध्ये मान्सून (monsoon) दाखल झाला असून तो काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात दाखल होईल. पावसाळ्यामध्ये मैदानात पाणी साचणे आणि खेळपट्टी निसरडी होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात. पाण्याने भरलेल्या मैदानात आणि निसरड्या पिचवर (Skiddy tracks) बॅटींग करण्याची कला सर्वांनाच जमत नाही. ते एक कौशल्याचं काम आहे. त्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे.
कोणत्याही पिचवर बॅटींगच्या प्रशिक्षणासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा अंतिम शब्द आहे. सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये बॅटींगमधील बहुतेक रेकॉर्ड्सना गवसणी घातली आहे. टेस्ट आणि वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स तसंच सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड आजही सचिनच्या नावावर आहे.
सचिननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचं क्रिकेटचं पॅशन कमी झालेलं नाही. तो संधी मिळेल तेव्हा हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटतो. सचिनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला (Viral) आहे.
सचिन या व्हिडीओमध्ये पाण्यानं भरलेल्या मैदानात निसरड्या पिचवर बॅटींग करत आहे. पिचवर पाणी असल्याने बॉल असमान उसळतोय, तरीही सचिनची एकाग्रता भंग होत नाही. या प्रकारच्या पिचवर बॅटींग कशी करायची याचा 'मास्टरक्लास' सचिननं घेतला आहे. जो पावसाळ्यात बॅटिंग करताना सर्वांना उपयोगी पडणार आहे.
Love and passion for the game always helps you find new ways to practice, and above all to enjoy what you do.#FlashbackFriday pic.twitter.com/7UHH13fe0Q
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 27, 2019
सचिन तेंडुलकर यावर्षी रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) सहभागी झाला होता. या सीरिजमध्ये त्याने इंडिया लिजेंड्स टीमचं नेतृत्त्व केलं. सचिनच्या टीममध्ये वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag), युवराज सिंह (Yuvraj Singh) या दिग्गजांचा समावेश होता.
'सर, ....रात्र संपवून टाका' 'द ग्रेट खली'कडे कॉमेडियननं केली मजेशीर विनंती
इंडिया लिजेंड्सनं फायनलमध्ये श्रीलंका लिंजेंड्सचा पराभव करुन विजेतेपद पटाकावले होते. या स्पर्धेनंतर सचिनला कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून बरा झाला असून त्याच्या मुंबईतील घरी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.