राहुल तेवातियानं सर्वांसमोर Kiss करुन ‘तिला’घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

राहुल तेवातियानं सर्वांसमोर Kiss करुन ‘तिला’घातली लग्नाची मागणी, पाहा VIDEO

राजस्थानचा ऑलराऊंडर राहुल तेवातिया (Rahul Tewatia) याचा हा व्हिडीओ आहे. त्यानं पार्टीमध्ये सर्वांसमोर घातलेली लग्नाची मागणी सोशल मीडियावर (Social Media) चांगली व्हायरल (Viral) झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे : आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान (IPL 2021) कोरोना व्हायरस (coronavirus) पासून बचाव करण्यासाठी बायो-बबल तयार करण्यात आले होते. या बायो-बबलमध्ये खेळाडूंवर अनेक प्रकारचे निर्बंध होते. त्याचबरोबर त्याचे काही फायदे देखील त्यांना मिळाले. विशेषत: देशांतर्गत पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंशी अगदी जवळून संवाद साधता आला.

आयपीएल फ्रँचायझींनी देखील खेळाडूंचा ताण हलका व्हावा, ते परस्परांच्या जवळ यावे यासाठी अनेक उपक्रम राबवले. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) देखील याचा भाग म्हणून एका पार्टीचं आयोजन केलं होतं. राजस्थानचा ओपनिंग बॅट्समन जोस बटलर (Joss Buttler) याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त 20 एप्रिल रोजी ही पार्टी झाली . या पार्टीमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.

राजस्थानचा ऑलराऊंडर राहुल तेवातिया (Rahul Tewatia) याचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये राजस्थानचे सर्व खेळाडू उशी पास करण्याचा एका गेम खेळत आहेत. हा खेळ राहुल तेवातियाजवळ येऊन थांबला. त्यानंतर त्याला पाण्याच्या बाटलीला प्रपोज करण्याचं टास्क मिळालं.

तेवातियानं देखील अगदी खिलाडू वृत्तीनं ते टास्क पूर्ण केलं. त्यानं पाण्याची बाटली हातामध्ये घेतली आणि  "तू खूप सुंदर आहेस. I Love You. माझ्याशी लग्न करशील का?' अशी मागणी घातली.

 भारत विरुद्ध इंग्लंड मालिका कोण जिंकणार?, राहुल द्रविडनं सांगितलं भविष्य

राजस्थान रॉयल्सनं हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. राजस्थान रॉयल्सनं या आयपीएलमध्ये 7 सामने खेळले असून त्यापाैकी 3 जिंकले असून पॉईंट टेबलमध्ये ते सध्या पाचव्या क्रमांकावर आहेत.

Published by: News18 Desk
First published: May 10, 2021, 1:34 PM IST

ताज्या बातम्या