एका कॅचमध्ये श्वानानं केलं तरुणाला आऊट, पाहा क्रिकेटचा मजेशीर VIDEO

एका कॅचमध्ये श्वानानं केलं तरुणाला आऊट, पाहा क्रिकेटचा मजेशीर VIDEO

दुसरीकडे सोमवारी आयपीएलच्या (IPL 20200) तेराव्या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार आणि उप-कर्णधार यांच्या लढत होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : आता IPLचे सामने सुरू आहेत. या आयपीएलचं वेड इतकं लोकांच्या डोक्यावर आहे की सकाळी क्रिकेटप्रेमी गल्लीत क्रिकेट खेळतात आणि संध्याकाळी टीव्हीवर IPL पाहतात. कोरोनाच्या काळात खेळण्यासाठी जास्त प्लेअर्स नसल्यानं श्वानही या क्रिकेटच्या खेळात सामील झाले आहेत. श्वान आणि तरुण अशी ही टीम गल्लीत क्रिकेट खेळताना दिसत आहे. IPLच्या पार्श्वभूमीवर या गल्लीतल्या या क्रिकेटचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हसून हसून पोटात दुखेल. एक तरुण बॉल टाकतो दुसरा तो बॉल असा काही टोलवतो की आता चौकरच जाणार एवढ्यात या तरुणासोबत असलेला श्वान उंच उडी मारून हा बॉल कॅच पकडतो आणि बॅटिंग करणाऱ्या तरुणाला आऊट करतो. चौकर मारण्याचं नुसतं स्वप्न तर सोडाच साधी एक रन काढण्याची संधीही हा श्वान बॅटिंग करणाऱ्या तरुणाला देत नाही.

हे वाचा-म्हशींनी सिंहाला असा दाखवला इंगा की थेट पळतच सुटला, पाहा VIDEO

इन्स्टाग्रामवर बिल्कुल एलिमेंट्री नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ साधारण 20 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. ज्याला 10 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला असून 4 लाखहून युझर्सनी लाईक केला आहे.

दुसरीकडे सोमवारी आयपीएलच्या (IPL 20200) तेराव्या हंगामात टीम इंडियाचा कर्णधार आणि उप-कर्णधार यांच्या लढत होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) एकमेकांशी दोन हात करणार आहे. त्यामुळे या सामन्यात काय होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 28, 2020, 5:54 PM IST

ताज्या बातम्या