IPL 2021: मॅच पाहणाऱ्या बाळाचा गोंडस Photo Viral, ओळखलं का ही आईमुलाची जोडी कोण आहे?

IPL 2021: मॅच पाहणाऱ्या बाळाचा गोंडस Photo Viral, ओळखलं का ही आईमुलाची जोडी कोण आहे?

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) या मॅचच्या दरम्यान पंजाब टीमच्या जर्सीतील एका महिला आणि तिच्या कडेवर असलेल्या बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान मैदानातील घटनेच्या प्रमाणेच मैदानाबाहेरच्या घटना देखील चर्चेत असतात. सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या मॅचच्या दरम्यान 'मिस्ट्री गर्ल' चा फोटो चांगलाच व्हायरल (Viral) झाला होता. आरसीबी विरुद्धच्या मॅचमध्ये मनिष पांडे (Manish Pandey) आऊट झाल्यानंतर  'मिस्ट्री गर्ल' चा पडलेला चेहरा पाहून अनेकांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली होती.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात शुक्रवारी आयपीएलमधील सातवी मॅच झाली. महेंद्रसिंह धोनीच्या सीएसकेनं ही मॅच सहा विकेट्सनं जिंकली.पंजाब किंग्जचा या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी त्यांच्या टीमच्या जर्सीतील एका महिला आणि तिच्या कडेवरील बाळाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही महिला तिच्या बाळाला कडेवर घेऊन उभी आहे.  इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) अधिकृत ट्विटरवरुन पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो आवडल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. तर काही जणांनी कोरोनाच्या काळात इतक्या लहान बाळाला घेऊन मॅच पाहयला येऊ नये असा सल्लाही या महिलेला दिला आहे.

सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो पंजाब किंग्जचा बॅट्समन मनदीप सिंहची (Mandeep Singh) पत्नी आणि मुलाचा हा फोटो आहे.  हे दोघे जण पंजाबची मॅच पाहण्यासाठी शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.

मनदीप सिंहला या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. मात्र तो पंजाबचा एक अनुभवी बॅट्समन आहे. त्यानं मागच्या आयपीएलमध्ये 7 मॅचमध्ये 130 रन काढले होते. मनदीपनं यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या टीमचं देखील प्रतिनिधीत्व केलं आहे.

CSK च्या 'या' बॅट्समननं केली रोहित शर्माची बरोबरी

मनदीप 2010 साली अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेल्या टीम इंडियाचा उपकर्णधार होता. त्याचबरोबर तो भारतीय टीमकडूनही तीन आंतरराष्ट्रीय टी20 मॅच खेळला आहे. सीएसकेविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबच्या बॅट्समननं निराशाजनक प्रदर्शन केलं. त्यामुळे अनुभवी मनदीपला खेळवण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करु शकते.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 11:24 AM IST

ताज्या बातम्या