चेन्नई, 15 मे : सोशल मीडियावर (Social media) अनेकदा लहान मुलांचे व्हिडीओ व्हायरल (Viral) होतात. त्या व्हिडीओमधील मुलाचं कौशल्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या एका 8 वर्षाच्या मुलाचा व्हिडीओ चर्चेत आहे. तो मुलगा त्याच्या घरात बॅटींग करतोय. पण तो ही बॅटींग बॅटनं नाही तर स्टम्पनं करत आहे. या मुलाचं नाव अश्वत्थ असून तो चेन्नईचा आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो' या वेबसाईटनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओतील हा चिमुरडा अगदी सहज ड्राईव्ह, स्वीप, स्कूप आणि फ्लिक हे शॉट्स लगावत आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) ट्रेडमार्क असलेला हेलिकॉप्टर शॉटही तो स्टम्पनं लगावतोय. तो मैदानाच्या चारही बाजूंना ज्या पद्धतीनं फटकेबाजी करतो ते पाहून अनेकांना मिस्टर 360 एबी डीव्हिलियर्सची (AB de villiers) आठवण येत आहे.
Mr.360 in his latest avatar: 8-year-old Ashwath from Chennai rocks it with a stump ♂️#YourShots pic.twitter.com/wkY2AE25qg
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 15, 2021
.. हा कोणता शॉट होता? विचित्र बॅटिंग पाहून तुम्हीही चक्रवाल - VIDEO
यापूर्वी केरळमधल्या एका मुलाचा देखील स्टंपनं फटकेबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.या मुलाची बॅट लॉकडाऊनमध्ये तुटली होती. त्यानंतर त्यानं स्टम्पनं सराव करण्यास सुरुवात केली, आणि अगदी कमी कालावधीत तो स्टम्पनं देखील अगदी सहज बॅटींग करु लागला, ही माहिती समजल्यानंतर 'राजस्थान रॉयल्स'नं या मुलाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ चेन्नईचा आणखी मुलाचा व्हिडीओ समोर आला आहे. ते पाहून भारतामध्ये क्रिकेटमधील गुणवत्तेची अजिबात कमतरता नाही, हे सिद्ध होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, MS Dhoni, Video viral, Video Viral On Social Media