• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • विद्यार्थी शेर तर शिक्षक सव्वाशेर! परीक्षेत मुलाने दाखवली अजब क्रिएटिव्हिटी; सरांनीही दिलं भन्नाट उत्तर

विद्यार्थी शेर तर शिक्षक सव्वाशेर! परीक्षेत मुलाने दाखवली अजब क्रिएटिव्हिटी; सरांनीही दिलं भन्नाट उत्तर

सध्या एका विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Answer Sheet) होत आहे. यात काही साध्या सरळ प्रश्नांची उत्तरं मुलानं अतिशय क्रिएटिव्हिटिनं (Creative Answer Sheet) दिली आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : परीक्षेनंतर पेपर तपासणंदेखील शिक्षकांसाठी मजेशीर काम असतं. जी मुलं वर्षभर चांगला अभ्यास करतात, त्यांच्या पेपरमध्ये तर प्रश्नांची बरोबर उत्तरं असतातच. मात्र, काही विद्यार्थी असेही असतात, ज्यांचं डोकं अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये फार चालतं. सध्या एका अशा विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral Answer Sheet) होत आहे. यात काही साध्या सरळ प्रश्नांची उत्तरं मुलानं अतिशय क्रिएटिव्हिटिनं (Creative Answer Sheet) दिली आहेत. या मुलानं सामान्या प्रश्नांची इतकी अजब उत्तरं दिली आहेत, जी कोणाच्याही डोक्यात सहजासहजी येणार नाहीत. 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं या मुलानं अशा पद्धतीनं दिली आहेत, ज्यांना बरोबरही म्हणू शकत नाही आणि चुकीचंही. मजेशीर बाब म्हणजे ही उत्तरं तपासणारा शिक्षकही अतिशय मजेशीर आहे. त्यांनी स्टूडंटला नापास केलं, मात्र तेही क्रिएटिव्ह अंदाजात. Shocking! छातीत आरपार गेल्या 2 लोखंडी सळ्या, 5 तास ऑपरेशननंतर घडलं अनपेक्षित ही व्हायरल उत्तरपत्रिका इन्स्टाग्रामवर ghantaa नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. यात विद्यार्थ्याने चार प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ते प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण पाहूया.
  प्रश्न - नेपोलियन कोणत्या युद्धात मरण पावला? उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात प्रश्न - स्वातंत्र्याचं घोषणापत्र कुठे साईन झालं? उत्तर - शेवटच्या पानावर प्रश्न - रावी नदी कोणत्या 'स्टेट'मध्ये वाहते? उत्तर - लिक्विड स्टेटमध्ये प्रश्न - घटस्फोटाचं मुख्य कारण काय आहे? उत्तर - लग्न याला म्हणतात जिद्द! न थांबता इवल्याशा पक्षानं 239 तासात पार केलं 13000 KM अंतर ही उत्तर वाचल्यानंतर तुम्हीही विचार कराल, की या मुलाकडे इतका टॅलेंट आहे तर तो अभ्यास का करत नाही? जितका चमत्कारी हा विद्यार्थी होता तितकेच ही उत्तरपत्रिका तपासणारे शिक्षकही. या प्रश्नांची उत्तर वाचल्यानंतर या विद्यार्थ्याला पास करण्याची त्यांची हिंमत तर झाली नाही. मात्र, त्यांनी त्याच्यासाठी पेपरवरच खास कमेंट लिहिली. त्यांनी लिहिलं, की क्रिएटिव्हिटीसाठी A+. सोशल मीडियावर सध्या ही उत्तरपत्रिका चांगलीच व्हायरल झाली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: