मराठी बातम्या /बातम्या /Viral /रेस्टॉरंटबाहेर बसली भुकेली मगर; ग्राहकांचा पाठलाग केला आणि... खतरनाक VIDEO समोर

रेस्टॉरंटबाहेर बसली भुकेली मगर; ग्राहकांचा पाठलाग केला आणि... खतरनाक VIDEO समोर

रेस्टॉरंटबाहेर ग्राहकांचा पाठलाग करणाऱ्या या मगरीचा व्हिडीओ (Crocodile video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रेस्टॉरंटबाहेर ग्राहकांचा पाठलाग करणाऱ्या या मगरीचा व्हिडीओ (Crocodile video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

रेस्टॉरंटबाहेर ग्राहकांचा पाठलाग करणाऱ्या या मगरीचा व्हिडीओ (Crocodile video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

वॉशिंग्टन, 20 मे : मगर (Crocodile) म्हणजे सामान्यपणे जंगल, नॅशनल पार्क किंवा फारफार तर झूमध्ये पाहायला मिळेल. पण सध्या अशा एका मगरीचा व्हिडीओ (Crocodile video) व्हायरल होतो आहे, जी चक्क एका रेस्टॉरंटसमोर ठाण मांडून बसली आहे. इतकंच नव्हे तर रेस्टॉरंटमधील ग्राहकांचाही ती पाठलाग करते आहे (Crocodile Chased Customers). फ्लोरिडातील (Florida) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

फ्लोरिडातल्या एका रेस्टॉरंटमधील पार्किंगमधून एक मगर ग्राहक आणि पादचाऱ्यांचा पाठलाग करत होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल करण्यात आलं.

वेंडी आऊटलेटबाहेर सहा फूट मगर ग्राहकांचा पाठलाग करत असल्याची माहिती मिळाल्याचं ली काऊंटी शेरिफ कार्यालयाने सांगितलं.

हे वाचा - गुपचूपपणे मोबाईलमध्ये काढत होता फोटो; तरुणींनी पाठलाग केला आणि... पाहा VIDEO

तसंच कदाचित या मगरीला चीज बर्गर हवं होतं म्हणून ती लोकांना घाबरत होती, अशी मजेशीर कमेंटही या विभागाने दिली आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार कदाचित ही मगर एका जलाशयातून दुसऱ्या जलाशयात जाण्याचा प्रयत्न करत होतं. पण वेंडीतील पार्किंगमुळे तिच्या या मार्गात खंड पडला, असावा असं वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचा - 'काँक्रिटच्या रस्त्यामध्येच अडकलं मुलीचं अर्ध शरीर...'; PHOTO पाहून नेटकरी हैराण

आता या मगरीला पकडून नागरिकांपासून दूर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal