फॅमेली पिकनिचा आनंद पडला महागात! न बोलवताही जेवणासाठी आले खेकडे, फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण

फॅमेली पिकनिचा आनंद पडला महागात! न बोलवताही जेवणासाठी आले खेकडे, फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण

पिकनिकचा आनंद लुटत असताना अचानक आले जंगलातले पाहुणे, पाहा PHOTOS

  • Share this:

मुंबई, 23 सप्टेंबर : आपल्या कुटुंबियांसोबत कुठे बाहेर जाण्याचं नियोजन केलं आणि त्याच दरम्यान कुणी आपल्या नियोजनात ढवळाढवळ केली तर याचा भयंकर राग येतो किंवा अचानक फिरायला गेल्यावर काही अडचणी उद्भवल्या की राग येतो पण एक कुटुंबासोबत जे घडलं ते ऐकून आणि पाहून तर तुम्ही हैराण व्हाल.

हे कुटुंबिया कोरोनामुळे कंटाळून जंगलपरिसरात पिकनिकचा आनंद घेत असताना जेवणासाठी अचानक मोठ्या संख्येनं पाहुणे आले आणि सगळ्या पिकनिकच्या आनंदावर पाणी फिरलं. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरामध्ये राहणाऱ्या एमी ल्युटेकचं कुटुंब पिकनिकसाठी ख्रिसमस आयलँड इथे पिकनिकसाठी गेले होते. त्याच वेळी सर्वजण आनंदात आणि बार्बेक्यूचा आनंद घेत असताना अचानक जेवणाच्या सुगंधानं जंगलातील खेकडेही हा आनंद साजरा करण्यासाठी तिथे आले. एक दोन नव्हे तर काहीशे खेकडे अगदी आपली फौज घेऊन यावेतसे हे खेकडे खाण्यासाठी तिथे आले होते.

हे वाचा-भारतीय सैन्याला घाबरून सीमेवर जाण्याआधी रडू लागले चिनी सैनिक, VIDEO VIRAL

ख्रिसमस बेटावरचं हे दृश्यं आणि त्यांचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या कुटुंबानं फेसबुकवर शेअर केला आहे. हे फोटो पाहून आपल्याच अंगावर काटा आल्या शिवाय राहणार. हे बेट जंगलात असल्यानं जवळपास खेकडे जेवणासाठी त्यांची फौज घेऊनच आले होते असं म्हणायला काय हरकत नाही. खेकड्याची ही एक संरक्षित प्रजाती असल्याचं सांगितलं जात आहे. यांचा स्वभाव खूप शांत असतो विनाकारण ते कुणावरही हल्ला करत नाहीत असं इथले लोक मानतात.

त्यामुळेच हे कुटुंबीय न घाबरता त्यांच्यासोबत छान जेवणाचा आनंद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत असून खेकड्यांमध्ये असणाऱ्या या कुटुंबाबद्दल युझर्स चिंता व्यक्त करत आहेत. अचानकपणे जेवायला आलेल्या खेकड्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 24, 2020, 9:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading