Crab Smoking Cigarette: अजून काय पाहाचयं बाकी आहे? सिगरेटचा धूर उडवताना दिसला चक्क खेकडा, VIDEO VIRAL

Crab Smoking Cigarette: अजून काय पाहाचयं बाकी आहे? सिगरेटचा धूर उडवताना दिसला चक्क खेकडा, VIDEO VIRAL

सिगरेटच्या पाकीटावरचा धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडाच करतोय स्मोकिंग, तुफान VIRAL होत असलेला VIDEO पाहिलात का?

  • Share this:

सिगरेटच्या पाकीटावर धुम्रपानाने कॅन्सर होण्याचा सल्ला देणारा खेकडा तुम्ही पाहिला असेल. मात्र तोच खेकडा आता सिगरेटचा धूर उडवताना (Crab Smoking Cigarette) दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक खेकडा आपल्या पंजांनी तुटलेल्या सिगरेटचा तुकडा पकडून सिगरेटचा छान धूर उडवताना दिसत आहे. इतकच नव्हे तर हा खेकडा सिगरेटचे झुरके मारत अगदी माणसाप्रमाणेचालतांना सुद्धा दिसत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शाहरूख इनामदार या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच त्याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत.

वाचा-पाणी पाहण्यासाठी थांबले होते पुलावर अन् बापलेकाचा गेला तोल, थरारक VIDEO

शाहरूख इनामदार याने व्हिडीओ शेअर करताना यावर 2020 मध्ये दिसलेली आणखी एक गोष्ट म्हणजे 'A Crab Smoke Cigarette' असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर *CrabSmokeCigarette ट्रेंड होत आहे.

वाचा-हाच खिलाडी नंबर 1! VIDEO पाहून विजेत्याऐवजी हरलेल्या खेळाडूचंच सर्वांकडून कौतुक

वाचा-मुसळधार पावसात पिकनिकला जाणं जीवावर बेतलं, अचानक पाणी वाढलं आणि...पाहा VIDEO

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिगरेटच्या पाकिटावर दिसणाऱ्या त्या खेकड्याची आठवण झाली. यावर अनेक मजेदार मिम्सही तयार करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हैराण झाले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की, एक खेकडा इतक्या चांगल्या पद्धतीने सिगरेट कशी काय ओढू शकतो?

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading